Wife Husband Viral Video: आयुष्यात आपल्या मनासारखा योग्य जोडीदार मिळणं म्हणजे नशिबच समजायचं. आपल्या सुख- दुःखात नेहमी साथ देणारा जोडीदार असला की सगळ्या संकटांना सामोरं जायला बळ मिळतं. आपल्या आवडीच्या माणसाचा क्षणभर सहवास जरी लाभला तरी तो हवाहवासा वाटतो. या नात्यात फक्त प्रेम आणि प्रेमाची अपेक्षा असते. आणि दोन्ही बाजूने प्रेम जर समान असेल तर आयुष्याचा प्रवास सुखकर होतो.
प्रेम महत्त्वाचं…
प्रत्येक नात जपायला थोडी अधिकची मेहनत घ्यावीच लागते. लहान-सहान गोष्टीने आपल्या त्या नात्याला फुलवणे गरजेचे असते. या नात्यात नवरा- बायकोचं नात खूप पवित्र मानलं जातं. एकमेकांबद्दल प्रेम, तितकाच आदर आणि विश्वास असणारं नात हे असतं. या नात्यात अनेकदा खटके उडतात परंतु, नात्याचं पावित्र्य जपून क्षणार्धात गोष्टी विसरून जाऊन त्या माणसाला आपलंसं करणारंदेखील हेच नात असतं.
हेही वाचा… दिवाळीआधी ‘ही’ गोष्ट केली नसेल तर लगेच करून घ्या, तरुणाची पुणेरी पाटी होतेय व्हायरल
सोशल मीडियावर नवरा बायकोच्या अशा प्रेमाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यात बायकोने अगदी हटके अंदाजात आपलं प्रेम व्यक्त केलं आहे.
व्हायरल व्हिडीओ
या व्हायरल व्हिडीओत बायको आणि नवरा स्कूटरवर बसलेले दिसतायत. यात नवऱ्याने पांढरं शुभ्र शर्ट घातलेलं दिसतंय. पण या सफेद शर्टावर बायकोने एक नवीनच डिझाईन तयार केली आहे. नवऱ्याच्या मागे बसून बायकोने त्याच्या शर्टाच्या मागच्या बाजूला किस केली आहे. यामुळे त्याच्या संपूर्ण सफेद शर्टावर ओठांसह तिच्या लिप्स्टिकचे डाग दिसतायत.
हा व्हिडीओ @hashtag_bongokonnya या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून तुरू लव्ह असं कॅप्शन या व्हिडीओला दिलं आहे. या व्हिडीओला तब्बल २६.८ मिलियन व्ह्यूज आले आहेत.
हेही वाचा… त्याची चूक काय? रस्त्यावर झोपलेल्या माणसाला आधी काठीने मारलं मग…, धक्कादायक VIDEO होतोय व्हायरल
युजर्सच्या प्रतिक्रिया
हा लव्हबर्ड्सचा व्हिडीओ पाहून अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया शेअर केल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “बायकोचं प्रेम असंच असतं” तर दुसऱ्याने “घरी आई खूप मारेल याला” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “हे खरोखर हे चांगले आहे परंतु अनोळखी व्यक्तींचे व्हिडिओ बनवणे आणि सोशल मीडियावर पोस्ट करणे अजिबात योग्य नाही कारण त्यांना यामुळे समस्यांना सामोरं जायला लागू शकतं.”