scorecardresearch

स्वयंपाकघराचे काम करत असताना जमिनीखाली सापडली २ कोटींची नाणी, जोडपे झाले मालामाल!

युनायटेड किंगडममधील एका जोडप्याला त्यांच्या घराचे नूतनीकरण करताना त्यांच्या स्वयंपाकघरातील मजल्याखाली सोन्याच्या नाण्यांचा ढीग सापडला. सापडलेली ही नाणी ४०० वर्षांहून अधिक जुनी आहेत.

स्वयंपाकघराचे काम करत असताना जमिनीखाली सापडली २ कोटींची नाणी, जोडपे झाले मालामाल!
photo(प्रातिनिधिक)

Couple Find Gold Coins: युनायटेड किंगडममधील एका जोडप्याला त्यांच्या घराचे नूतनीकरण करताना त्यांच्या स्वयंपाकघरातील मजल्याखाली सोन्याच्या नाण्यांचा ढीग सापडला. सापडलेली ही नाणी ४०० वर्षांहून अधिक जुनी आहेत. यामध्ये २६४ सोन्याचे तुकडे, जे ४०० वर्षांहून अधिक जुने आहे. याचा खुलासा तेव्हा झाला, जेव्हा नॉर्थ यॉर्कशायरच्या घरात मजल्याचे नूतनीकरण केले जात होते. हे जोडपे आता ही नाणी दीड लाख पाऊंडला विकणार आहेत. या जोडप्याला कल्पना देखील नव्हती की ते ज्या घरात वर्षानुवर्षे राहतात त्यांना तिथे एवढा मोठा खजिना मिळेल. जमिनीत गाडलेले सोने आपले नशीब बदलणार आहे हे त्यांना माहीत नव्हते.

स्वयंपाकघरातील मजल्यावर सोन्याची नाणी सापडली

स्वयंपाकघरातील फरशीचे काम करताना असे घडू शकते याची या जोडप्याला कल्पनाही नव्हती. तो त्यांच्यासाठी खूप धक्कादायक क्षण होता. घराच्या मजल्याचे नूतनीकरण करायला सुरुवात करताच, त्याने कधीही अपेक्षा केली नव्हती असे काहीतरी पाहिले. कदाचित यालाच नशीब बदलणे म्हणतात. जोडप्याने पुढे पाहणी केली असता नाण्यांच्या ढिगाऱ्याने भरलेला हा मातीचे मडके असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

( हे ही वाचा: ग्राहकाने मुस्लिम डिलिव्हरी बॉयकडून जेवण घेण्यास दिला नकार; सोशल मीडियावर झाला मेसेज व्हायरल)

२ कोटींहून अधिक किमतीची आहेत नाणी

जेव्हा तज्ञांनी त्यातील सामग्री पाहिली तेव्हा त्यांना आढळले की ते २५०,००० पाउंड म्हणजेच २.३ कोटी रुपये किंमतीच्या वर आहेत. द सनने नोंदवले की ही नाणी १६१० ते १७२७ पर्यंतची आहेत आणि त्यात जेम्स फर्स्ट आणि चार्ल्स फर्स्ट ते जॉर्ज फर्स्ट यांच्या काळातील नाणी आहेत. भाग्यवान जोडप्याने घाईघाईने लंडनचा लिलाव करणार्‍या स्पिंक अँड सनला कॉल केला आणि एक तज्ञ संग्रह पाहण्यासाठी त्यांच्या घरी गेला.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Couple was getting the kitchen floor repaired suddenly found gold coins worth 2 crores gps

ताज्या बातम्या