Striped Tiger Viral Video : गेल्या कित्येक वर्षांपासून मानवी वसाहतींमध्ये वन्य प्राण्यांचा शिरकाव चिंतेचा विषय ठरत आहे. नैसर्गिक अधिवास कमी झाल्यामुळे आणि अन्नाच्या शोधात वन्य पाराणी मानवी वस्तीत शिरकाव करतात आणि आपल्या भक्ष्याची शिकार करता प्राणी जनावरांवर हल्ला करतातच पण माणसांवरही हल्ला करता. ज्यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते. गेल्या काही दिवसांपासून बिबट्याची दहशत पसरवणारे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान अशाच एका वन्य प्राण्याचा हल्ला करणारा एक व्हायरल सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.
रात्रीच्या वेळी गडद अंधारात जंगलाजवळील रस्त्यावरून जाताना तुमच्या समोर अचानक वाघ आला तर काय होईल? अर्थाथच तुमच्या काळजाचा ठोका चुकेल आणि भितीने काळजाचा थरकाप उडेल. असाच काहीसा प्रकार या व्हायरल व्हिडीओमध्ये घडला आहे. रात्रीच्या वेळी बाईवरून जाणाऱ्या एका दांपत्याच्या समोर अचानक पट्टेरी वाघ आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
अचानक दुचाकीसमोर आला पट्टेरी वाघ
व्हायरल व्हिडिओ इंस्टाग्रामवर marathavlogs नावाच्या पेजवर पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये दिसते की, रात्रीच्या अंधारात सामसुम रस्त्यावरून एक जोडपे दुचाकीवरून जात होते दरम्यान, जंगलात झुडुपामध्ये एक पट्टेरी वाघ दबा देऊन बसला होता , जशी त्याला संधी मिळाली तशी त्याने दुचाकीसमोर उडी मारली. पण सुदैवाने दोघेही थोडक्यात वाचले. दुचाकी चालक काही क्षण गडबडला पण न थांबता तो पुढे जात राहिला. दुचाकीवरील दांपत्याला सुदैवाने कोणतीही जखम झाली नाही.
हा संपूर्ण प्रकार त्या दुचाकीच्या मागील कारमधील व्यक्तीच्या कॅमेऱ्यात कैद झाला. व्हिडिओ पाहून अनेकांना अंगावर शहारा उभा राहतोय. सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहून अनेकांनी एआय असल्याचा दावा केला.
रात्रीच्या अंधारात आणि जंगलाच्या परिसरात या प्रकारचे संकट नेहमीच वन्य प्राण्याचां हल्ल्याचा धोका असतो त्यामुळे प्रवाश्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे. तसंच, वन्यजीवांचे नैसर्गिक अधिवास सुरक्षित ठेवणे आणि रस्त्यावरून सावधगिरीने चालणे गरजेचे आहे. जगंलाजवळील सामसूम रस्त्यावरून रात्री प्रवास करताना वाहनाचा वेग कमी ठेवावा आणि अंधारात रस्त्याजवळील झुडुपांकडे लक्ष ठेवावे.
