Viral video: काही लोकांना प्राण्यांचे व्हिडीओ पाहायला अधिक आवडतात. काही वेळा प्राण्यांचे चांगले व्हिडीओ पाहायला मिळतात. तर, काही वेळेला प्राण्यांनी लोकांवरती हल्ले केल्याचे व्हिडीओ असतात. सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यात अनेक व्हिडिओ प्राण्यांचेदेखील असतात. प्राणी हे खूप हुशार असतात, असं म्हणतात. बंदिस्त राहायला कुणालाच आवडत नाही. माणसं असो किंवा प्राणी कुठे बंदिस्त ठेवलं की सगळ्यांचीच घुसमट होते. मात्र तरीही आजुबाजूला असे अनेक लोक आहेत, जे प्राण्यांना बंदिस्त करुन ठेवतात. अशाच एका गाईचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे. मात्र या गाईने मालकाला चांगलंच फसवलंय. गाईनं असं डोकं लावलंय की पाहून तुम्हीही म्हणाल, हे फक्त भारतातच होऊ शकतं. या गाईचा व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल. तुम्ही आतापर्यंत वन्यजीवांचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. पण, आज आम्ही तुम्हाला एक असा व्हिडीओ दाखवणार आहोत; जो तुम्ही याआधी नक्कीच पाहिला नसेल. सोशल मीडियामुळे कधी कुठला व्हिडीओ व्हायरल होईल हे सांगता येत नाही. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, मालकानं गाईला एका बाजूला बांधून ठेवलं आहे. तिच्या पुढ्यात तिला चाराही खाण्यासाठी दिला आहे. मात्र प्राणी असला तरी एका जागेवर कितीवेळ थांबणार. अशाच वैतागलेल्या गाईन तिथून सुटण्यासाठी असं डोक लावलं की तुम्हीही अवाक् व्हाल. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, गाय स्वत:च्या शिंगाने ज्या दोरीने बांधलं आहे ती दोरी सोडवते. अतिशय सहजरित्या ही गाय दोरी काढते आणि निघून जाते. पाहा व्हिडीओ हेही वाचा >> VIDEO: अंधेरी-घाटकोपर लिंक रोडवर दारूच्या नशेत तरुणाने खिडकीला लटकून चालवली कार; शेवटी काय घडलं पाहा हा व्हिडीओ सोशल मीडियावर marathi_epic_jokes नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून कॅप्शनमध्ये हे भक्त भारतातल्या गाईच करु शकतात असं लिहलं आहे. दरम्यान या वापरकर्त्यानं चुकून गाईला म्हस म्हंटल्यामुळ्या नेटकरी ट्रोल करत आहेत. तर काहीजण या गाईच्या हुशारीवरही प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, “या गाईला एक पुरस्कार द्या”, तर दुसऱ्या युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, “किती हुशार गाई आहे”, तर तिसऱ्या युजरने लिहिलंय की, “याचा सत्कार करा”