गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. Aviral Sangal असं या X युजरचं नाव असून त्यानं ७ सप्टेंबरला ही पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये अविरलनं CRED या वित्तीय सेवा पुरवणाऱ्या कंपनीवर आरोप केले आहेत. क्रेडकडून दर आठवड्याला आयोजित केल्या जाणाऱ्या जॅकपॉटमध्ये जिंकूनही आश्वासन दिलेलं बंपर प्राईज आपल्याला मिळालंच नाही, असं अविरल यांचं म्हणणं आहे. शिवाय, आपल्यासारखेच आणखी २०० युजर्सही ‘टेक्निकल ग्लिच’ मुळे जिंकल्याचं कंपनीनं आपल्या सांगितल्याचा दावाही अविरलनं केला आहे.

आपला खप वाढावा, लोकांपर्यंत अधिकाधिक पोहोचता यावं किंवा लोकांमध्ये आपली चर्चा व्हावी म्हणून कंपन्यांकडून अनेक प्रकारच्या क्लृप्त्या केल्या जातात. यातल्या काही यशस्वी होतात, तर काही चांगल्याच बुमरँग होतात. CRED कडून दर आठवड्यात शुक्रवारी आयोजित केल्या जाणाऱ्या जॅकपॉबाबत असंच काहीसं घडल्याचं काही एक्स युजर्सच्या व्हायरल सोशल पोस्ट्सवरून दिसून येत आहे. या पोस्ट्समध्ये युजर्सकडून जॅकपॉट जिंकल्यानंतरही बंपर प्राईज न मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे.

father and daughter short viral video
लेकीचं प्रेम! बाबाला नवीन नोकरी मिळाल्यानंतर चिमुकलीला झाला आनंद; ह्रदयस्पर्शी Video एकदा बघाच
Animal viral video
“शेवटी कर्माचे फळ मिळतेच…” गेंड्याने ट्रकचालकावर केला हल्ला…
The recipe of the syrup was told by the boy
निरागस चिमुकला सरबत बनवण्याची रेसिपी सांगितल्यानंतर असं काही म्हणाला… ; VIDEO पाहून नेटकऱ्यांना आलं हसू
girl's did a great dance
“आईशप्पथ, काय नाचतेस गं…”, ‘तू रमता जोगी’ गाण्यावर चिमुकल्यांनी केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
Kokan Bhajan Dabalbari viral video
व्वा मानलं बुवा! भजनात चक्क डोक्यानी वाजवली पेटी; Video पाहून युजर म्हणाला, “नादखुळा…”
Thief snatches girls phone through train window robbery viral video
“मम्मी मेरा फोन…”, विंडो सीटवर बसलेल्या लहान मुलीचा फोन चोराने केला लंपास, VIDEOमध्ये पाहा नेमकं काय घडलं?
Israeli PM Benjamin Netanyahu Fact Check
इराणने मिसाईल हल्ला करताच इस्त्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी बॉम्ब शेल्टरकडे घेतली धाव? Video खरा, पण नेमका कधीचा? वाचा सत्य
Israel-Iran war fact check video Tel Aviv bus fire
इस्त्राइलची राजधानी तेल अवीवमध्ये मोठा विध्वंस! अनेक बसेस आगीच्या भक्षस्थानी; Viral Video खरंच युद्धादरम्यानचा आहे का? वाचा सत्य
Viral video of uncle catching running mumbai local train accident
काका काय करताय? चालती ट्रेन पकडण्याच्या नादात काकांबरोबर घडलं असं काही की…, VIDEO पाहून तुम्हीही माराल कपाळावर हात

काय होतं बंपर गिफ्ट?

काही युजर्सकडून सोशल मीडियावर दावा करण्यात आल्यानुसार, कंपनीकडून हा जॅकपॉट जिंकणाऱ्याला एक बंपर प्राईज दिलं जाणार होतं. त्यात अॅपलचा मॅकबुक, आयपॅड आणि एअरपॉड अशा गोष्टी असणार होत्या. या वस्तूंच एकूण किंमत जवळपास १ ते ३ लाखांच्या घरात असल्याचाही दावा करण्यात आला आहे. अविरल संगलनं केलेल्या दाव्यानुसार ही रक्कम ३.२५ लाखांच्या घरात जाते.

CRED Friday Jackpot
क्रेड जॅकपॉटबाबत सोशल पोस्ट व्हायरल (फोटो – @sangalaviral)

काय आहे व्हायरल पोस्टमधला दावा?

अविरल संगल यांनी केलेल्या पोस्टमध्ये या युजरनं CRED चा जॅकपॉट जिंकल्याचा दावा केला आहे. त्यासा स्क्रीनशॉटही पोस्टसोबत जोडण्यात आला आहे. “मी क्रेड क्लपचे जॅकपॉट सहसा खेळत नाही. पण शुक्रवारी मी सहज म्हणून तो खेळलो आणि जिंकलो. त्यात जवळपास ३.२५ लाख किंमतीचे मॅकबुक, आयपॅड, एअरपॉड्स मॅक्स आणि एक टमी बॅग अशा वस्तू होत्या”, असं अविरल यांच्या पोस्टमध्ये आहे.

“काँग्रेस नेत्यांकडे काळा पैसा आहे” असा दावा करणारा मल्लिकार्जुन खरगे यांचा Viral Video खोटा, जाणून घ्या काय आहे सत्य?

“मी जॅकपॉट जिंकल्यानंतर आलेला फॉर्म भरून दिला. त्यांनी जॅकपॉटवरचा टीडीएस भरण्यासाठी माझा पॅन नंबरही घेतला. पण काही मिनिटांत मला क्रेडच्या टीमकडून फोन आला आणि त्यांनी जॅकपॉट तांत्रिक समस्येमुळे रद्द करावा लागत असल्याचं सांगितलं. शिवाय, माझे कॉइन आणि भरपाई म्हणून १ हजार रुपयांचा कॅशबॅक देत असल्याचंही ते म्हणाले. पण मी त्यांची ऑफर नाकारली आहे”, असं अविरल संगल यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

एक नव्हे, २०० युजर्स जिंकले!

दरम्यान, अविरल संगल याच अकाऊंटवरून करण्यात आलेल्या पुढच्या पोस्टमध्ये २०० युजर्सचा दावा करण्यात आला आहे. “क्रेडकडून मला आणखी एक कॉल येऊन गेला. एका तांत्रिक बिघाडामुळे २०० युजर्स हा जॅकपॉट जिंकले. त्यामुळे आम्ही हा जॅकपॉट रद्द करत आहोत. त्याऐवजी त्यांनी बिघाड दुरुस्त करून जिंकलेल्या २०० युजर्सला बक्षिस देऊन त्यांचा सन्मान केला पाहिजे. त्यांनी जाहीरपणे या गोष्टीवर स्पष्टीकरण द्यावं, नाहीतर माझ्याकडे कायदेशीर मार्गही आहेत”, असा इशाराच अविरल संगल यांनी दिला आहे.

अविरल संगल यांच्याप्रमाणेच इतरही काही युजर्सकडून X वर अशीच तक्रार करणाऱ्या पोस्ट करण्यात आल्या आहेत. दरम्यान, यासंदर्भात क्रेडकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. एका युजरच्या अशाच पोस्टवर CRED Support नावाच्या कंपनीच्याच एका अकाऊंटवरून रिप्लाय करण्यात आला आहे. त्यात “तुमची माहिती आम्हाला पाठवा, आमची तज्ज्ञांची टीम तुम्हाला संपर्क करून तुमची अडचण सोडवेल”, असं नमूद करण्यात आलं आहे.

क्रेडचे संस्थापक कुणाल शाह यांच्या एक्स अकाऊंटवर शेवटची पोस्ट ६ सप्टेंबरची असून त्यात त्यांनी जागतिक स्तरावर घटणाऱ्या जन्मदराबाबत चिंता व्यक्त केली आहे.