scorecardresearch

Cricket Dance : क्रिकेट डान्स पाहिला का? पाहा हा अनोखा डान्स प्रकार, व्हिडीओ होतोय व्हायरल

सध्या असाच एक व्हिडीओ पुन्हा चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती चक्क क्रिकेट डान्स करताना दिसत आहे. तु्म्हाला वाटेल क्रिकेट डान्स म्हणजे नेमकं काय? त्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल.

Cricket Dance
क्रिकेट डान्स पाहिला का? (Photo : Instagram)

Dance Video : विश्वचषक २०२३ च्या अंतिम सामन्यात भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वबाद झाला आणि त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर क्रिकेट संबंधीत अनेक व्हिडीओ शेअर केले जात आहे. काही जुने व्हिडीओ सुद्धा पुन्हा व्हायरल होत आहे. सध्या असाच एक व्हिडीओ पुन्हा चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती चक्क क्रिकेट डान्स करताना दिसत आहे. तु्म्हाला वाटेल क्रिकेट डान्स म्हणजे नेमकं काय? त्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल.

हा व्हायरल व्हिडीओ एका घरगुती कार्यक्रमातील आहे. व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक व्यक्ती भन्नाट डान्स करताना दिसत आहे. डान्स करताना तो फलंदाजी आणि गोलंदाजी करतानाच्या डान्स स्टेप्स करताना दिसत आहे. पुढे तो डान्स करताना झेल पकडण्याची सुद्धा स्टेप करताना दिसतो. त्याचा हा अनोखा डान्स पाहून तुम्हाला वाटेल हा क्रिकेट डान्स आहे. सध्या या क्रिकेट डान्सची सगळीकडे चर्चा सुरू आहे.

viral video Three men rescued after they drive SUV into fast flowing river
भलतं धाडस पडलं महागात! तरुणांनी थेट नदीत उतरवली कार अन्….; थरारक व्हिडीओ पाहून अंगावर येईल शहारा
Gautami Patil danced with child
Gautami Patil : “दिल है छोटा सा…” गौतमी पाटीलने केला चिमुकल्याबरोबर डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल
Little Girl Trying To Click the Lord Bappa Photo Video goes viral
“बाप्पा, मोबाईलकडे बघ..” फोटो काढण्यासाठी चिमुकलीने लाडक्या गणरायाला दिली साद, गोंडस व्हिडिओ होतोय व्हायरल
funny video goes viral instagram
VIDEO : जेव्हा मराठमोळ्या आजीला नात हिंदी गाणं शिकवायला जाते…; व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर हसू आवरणार नाही…

हेही वाचा : World Cup 2023 : विश्वचषक जिंकल्यानंतर विराट कोहलीने ग्लेन मॅक्सवेलचे अभिनंदन करत दिली ‘ही’ खास भेट

themayankhardiya या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “क्रिकेट डान्स”अनेक युजर्सनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

एका युजरने लिहिलेय, “मी आजवर पाहिलेला सर्वात छान डान्स” तर एका युजरने लिहिलेय, “याला म्हणतात महान क्रिकेटर लव्हर” आणखी एका युजरने लिहिलेय, “भाऊ डान्स करत आहे की मॅच खेळत आहे” काही युजर्सनी या व्हिडीओवर हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Cricket dance do you see cricket dance type video goes viral ndj

First published on: 21-11-2023 at 10:43 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×