भारतीय लोक क्रिकेटवर खूप प्रेम करतात. भारतीय लोकांसाठी क्रिकेट हा खेळ नसून भावना आहे. वर्ल्ड कप इथे एखाद्या सणासारखा साजरा केला जातो. तुम्ही भारतातील कोणत्याही रस्त्यावर किंवा गल्लीबोळ्यात गेलात तर तुम्हाला नक्कीच कोणी ना कोणी लहान मूलं क्रिकेट खेळताना दिसतील. विशेष म्हणजे रविवार हा तर जवळपास अनेक भारतीय तरुणांसाठी क्रिकेटचा दिवस असतो. पण आता तुम्ही विचार करत असाल की, या सर्व गोष्टी सांगण्यामागचे कारण काय? तर कारणंही तसेच आहे, सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. ज्यात एका व्यक्तीने क्रिकेटची आवड जोपासण्यासाठी असे काही केले की जे पाहून तुम्ही अवाक व्हाल.

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एका इमारतीच्या छतावर बांबू, ड्रिल मशीन आणि क्रिकेट नेट ठेवली आहे. यानंतर ती व्यक्ती बांबूला ड्रिल मशीनने छिद्र पाडून ते बांबू गच्छीच्या काठावर उभे करुन फिट करताना दिसत आहे. छताच्या सर्व कोपऱ्यांमध्ये बांबू फिट करुन झाल्यानंतर तो व्यक्ती बांबूवर नेट फिट करतो. काही वेळातच ती व्यक्ती इमारतीच्या छताचे क्रिकेटच्या भल्यामोठ्या मैदानात रुपांतर करतो. यानंतर तिथे लाईट्स लावतो आणि सामना खेळताना दिसतो. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

raj thackray mns latest news
“राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम”, मनसेला गळती; सात शिलेदारांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
Mumbai Women Buys 19 Flats Worth 118 Crores In Malbar Hill
“बंगल्यासमोर बिल्डिंग बांधली, समुद्र कसा बघू?”, म्हणत दक्षिण मुंबईत १९ फ्लॅट्स विकत घेणारी ‘ती’ आहे तरी कोण?
UCO bank Photo
युको बँकेत ८२० कोटींचा पेमेंट घोटाळा, सीबीआयकडून महाराष्ट्र, राजस्थानात धाडी
Indian Man who earns Rs 5 crore daily his parents wanted him to pursue PhD Google CEO Sundar Pichai Daily Salary Morning Habits
भारतीय तरुणाला दिवसाचा पगार ५ कोटी, नावाचा जगभर डंका; आई वडिलांची इच्छा होती PhD करावी पण त्यानं..

हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर @tanzeem_malik नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. ज्यावर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूजरने लिहिले – खूप सुंदर दिसत आहे, मला पण नेट आणायचे आहे. आणखी एका यूजरने लिहिले – हे क्रिकेट नाही तर प्रेम आहे. तिसऱ्या यूजरने लिहिले – हे खरे घरचे मैदान आहे. एका युजरने लिहिले- फक्त क्रिकेटप्रेमीच हे फील करु शकतात.