रोनाल्डोच्या भेटीसाठी मैदानात धावत आली चिमुकली फॅन, Cristiano Ronaldo ने दिलं हे खास गिफ्ट, पाहा VIRAL VIDEO

पार्तुगाल विरूद्ध आयर्लंड या सामना दरम्यान पोर्तुगालचा क्रिस्टियानो रोनाल्डो निराशा झाला असला तरी त्याने त्याच्या फॅनचं स्वप्न मात्र पूर्ण केलंय. या सामना दरम्यान भावूक क्षण पहायला मिळाला. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

cristiano-ronaldo-give-shirt-to-ireland-fan

फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये पहिली हॅट्ट्रिक लावणारा पोर्तुगालचा क्रिस्टियानो रोनाल्डो या फुटबॉलवीराची नुकत्याच पार पडलेल्या पोर्तुगाल विरूद्ध आयर्लंड या सामन्याच्या ड्रॉमुळे निराशा झाली असली तरी क्रिस्टियानो रोनाल्डोने त्याच्या आयर्लंडमधल्या चिमुकल्या फॅनचं स्वप्न मात्र पूर्ण केलंय. निराश असला तरी त्याने पुन्हा एकदा आपण मैदानाबाहेरही हिरो असल्याचं सिद्ध केलंय. आयर्लंडविरुद्ध मॅचनंतर मैदानात आयर्लंडची एक चिमुरडी फॅन रोनाल्डोची एक झलक पाहण्यासाठी अक्षरशः रडत होती. अनेक विक्रम नावावर असलेल्या या खेळाडूला मैदानात प्रत्यक्ष समोर पाहताना या चिमुरडीला तिच्या भावना आवरता आल्या नाहीत. हे पाहून रोनाल्डोने तिला मिठीत घेत तिच्या अश्रूंना वाट करून दिली. इतकंच नव्हे तर त्याने एक खास गिफ्ट देऊन तिचं स्वप्न पूर्ण केलंय. हा भावूक क्षण पाहून रोनाल्डोने स्टेडिअममध्ये उपस्थित असलेल्या प्रत्येकाचं मन जिंकलं आहे.

पोर्तुगाल आणि आयर्लंड यांच्यात झालेल्या सामन्यात हा भावूक क्षण पाहायला मिळाला. या व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. डब्लिन इथल्या अविवा स्टेडियममध्ये आयर्लंडविरुद्ध सामना झाल्यानंतर हा चिमुकली सुरक्षा रक्षकांना चमका देत मैदानात धावत आली. मैदानात आल्यानंतर ती थेट क्रिस्टियानो रोनाल्डोकडे आली. या चिमुकलीने आयर्लंडची जर्सी परिधान केलेली होती. ती रोनाल्डोला मिठी मारण्यासाठी मैदानात धावत आली होती. रोनाल्डोची नजर त्या मुलावर गेली आणि त्याला राहावले नाही. यावेळी रोनाल्डोने तिला जवळ घेत मिठी मारली आणि काही सेंकद तो तिच्याशी बोलला. इतकंच काय तर रोनाल्डोने त्याच्या अंगावरील जर्सी या चिमुकल्या फॅनला भेट म्हणून दिली. यावेळी स्टेडिअममधील सर्व प्रेक्षकांचं लक्ष या मुलीवर गेलं. यावर ती छोटुशी फॅन पुन्हा रडली, पण यावेळी तिचे अश्रू आनंदाचे होते. त्या मुलीचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. त्यानंतर सुरक्षारक्षक तिला मैदानाबाहेर घेऊन गेले.

याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागला आहे. या व्हिडीओवर नेटिझन्सनी आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यास सुरूवात केलीय. या मुलीला वाटले की तिच्या या कृतीमुळे सुमारे £2,500 इतका मोठा दंड होऊ शकतो. सुदैवाने, या मुलीवर व्हेलन फुटबॉल असोसिएशन ऑफ आयर्लंड (एफएआय) ने तिच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. याचीच पुष्टी देणारं एक निवेदन देखील जारी करण्यात आलंय. या मुलीचं नाव एडिसन असं असल्याचं सांगण्यात येतंय. ती अकरा वर्षीची असून रोनाल्डोची मोठी चाहती आहे.

आणखी वाचा : ब्लॅक स्विमसूट आणि कलरफूल सारॉंग परिधान करत महिलेचा ‘Manike Mage Hithe’ वर डान्सचा VIDEO VIRAL

आणखी वाचा : VIRAL VIDEO : महाकाय मगरीला पाहून महिलेने पायातली चप्पल काढली आणि पुढे जे केलं ते पाहून तुम्ही पोट धरून हसाल…

प्रसिद्ध पोर्तुगीज फुटबॉलपटूने तिला जर्सी दिल्यानंतर प्रतिक्रिया देताना ‘स्वप्न पूर्ण झाले’ असे उद्गार तिने काढले. रोनाल्डोच्या जादुई खेळाचे अनेक दिवाने आहेत. रोनाल्डोचे फॅन त्याच्या भेटीसाठी थेट मैदानात आल्याची ही काही पहिली वेळ नाहीय. यापूर्वी सुद्धा २०१८ साली फिफा वर्ल्ड कपदरम्यान अशाच एका मुलाने रोनाल्डोच्या भेटीसाठी हट्ट धरला होता. त्यावेळी रोनाल्डोने बसमधून उतरून त्याला मिठी मारली होती आणि त्याच्यासोबत फोटोज सुद्धा क्लिक केले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Cristiano ronaldo gives his shirt to 11 year old ireland fan who invaded pitch prp

Next Story
पाहा: वधू आणि तिच्या भावाचा संगीत सोहळ्यातील धम्माल परफॉर्मन्सBride and brother pull of epic wedding dance , संगीत सोहळा, video goes viral , bride and her brother perform a Bollywood medley at the Sangeet, Loksatta, Loksatta news, Marathi, marathi news
ताज्या बातम्या