मगर एक शक्तिशाली उभयचर प्राणी आहे. पाण्यात तर मगरीची शक्ती दुप्पटीने वाढते. त्यामुळे पाण्यात मगरीशी वैर नको, अशी म्हण प्रचलित आहे. एकदा का मगरीच्या तावडीत भक्ष्य सापडलं की, वाचणं कठीण असतं. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही धक्का बसेल. व्हायरल व्हिडीओत एक मुलगा मगरीला खाणं देत आहे. मात्र असं करत असताना अचानक मगरीने केलेलं कृत्य पाहून तुम्हीही धास्ती घ्याल. व्हायरल झालेला व्हिडीओ २५ सेकंदाचा आहे.

व्हायरल व्हिडीओत नदीच्या काठावर असलेल्या झुडपांजवळ एक मुलगा मगरीला खाणं देत आहे. तर त्याचा मित्र त्याचा व्हिडीओ चित्रित करत आहे. खाणं खाण्यासाठी मगर आपला मोठा जबडा उघडते. पण मांस खाता खाताच मगर व्यक्तीपर्यंत पोहोचते. मगरीला अगदी जवळून पाहून व्यक्तीची तारांबळ उडते. त्यानंतर मगर मुलावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचे तुम्ही पाहू शकता. पण मुलगा कसा तरी तेथून पळून जाण्यात यशस्वी होतो. एका सेकंदाचा तरी विलंब झाला असता तर मगरीने त्याला पाण्यात खेचून नेले असते.

Death of mother and son due to contact with electric wire installed in the field in Boisar
बोईसर: शेतामध्ये लावलेल्या विद्युत तारेचा स्पर्श होऊन आई- मुलाचा मृत्यू
Is eating poha better than idli for breakfast
Poha Or Idli : नाश्त्यात पोह्यापेक्षा इडली खाणे चांगले? मधुमेहाच्या रुग्णांसाठी कोणता नाश्ता चांगला? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….
boat
पालघर: कृत्रिम भित्तिका समुद्रात सोडणारी बोट सातपाटीच्या खडकावर अडकली
Are you getting enough sleep at night 5 habits that are slowing down your
तुमची झोप पूर्ण होत नाही का? तुमच्या ‘या’ पाच सवयींमुळे बिघडते तुमचे चयापचय

मगरीचा हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर discoversharks नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. १८ जानेवारीला हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. हा व्हिडीओ नेटकरी वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून ही संख्या सातत्याने वाढत आहे.