मगर एक शक्तिशाली उभयचर प्राणी आहे. पाण्यात तर मगरीची शक्ती दुप्पटीने वाढते. त्यामुळे पाण्यात मगरीशी वैर नको, अशी म्हण प्रचलित आहे. एकदा का मगरीच्या तावडीत भक्ष्य सापडलं की, वाचणं कठीण असतं. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही धक्का बसेल. व्हायरल व्हिडीओत एक मुलगा मगरीला खाणं देत आहे. मात्र असं करत असताना अचानक मगरीने केलेलं कृत्य पाहून तुम्हीही धास्ती घ्याल. व्हायरल झालेला व्हिडीओ २५ सेकंदाचा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल व्हिडीओत नदीच्या काठावर असलेल्या झुडपांजवळ एक मुलगा मगरीला खाणं देत आहे. तर त्याचा मित्र त्याचा व्हिडीओ चित्रित करत आहे. खाणं खाण्यासाठी मगर आपला मोठा जबडा उघडते. पण मांस खाता खाताच मगर व्यक्तीपर्यंत पोहोचते. मगरीला अगदी जवळून पाहून व्यक्तीची तारांबळ उडते. त्यानंतर मगर मुलावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचे तुम्ही पाहू शकता. पण मुलगा कसा तरी तेथून पळून जाण्यात यशस्वी होतो. एका सेकंदाचा तरी विलंब झाला असता तर मगरीने त्याला पाण्यात खेचून नेले असते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crocodile attack on man video viral on social media rmt
First published on: 28-01-2022 at 10:50 IST