scorecardresearch

Scary! नदीमधून जाताना मगरीने केला हल्ला, कॅमेरात कैद झाला थरार

व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला

Scary! नदीमधून जाताना मगरीने केला हल्ला, कॅमेरात कैद झाला थरार

नॉर्थ कॅरोलिनामधील कायकेरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. CNN च्या रिपोर्ट्सनुसार पीट जॉयस नावाचा एक व्यक्ती Waccamaw नदीत अडकला होता. त्याचवेळी एका मगरीने त्याच्या बोटीवर हल्ला केला. जॉयसने Youtube वर या घटनाचा संपूर्ण व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यासोबत त्यानं कॅप्शनमध्ये लिहलेय की, जनावरांनी माझं खूप जोशमध्ये स्वागत केलं.

पीट जॉयस म्हणतात की, देवाच्या कृपेमुळे मगरीच्या हल्लायतून वाचलो. मगरीने हल्ला केल्यानंतर एका झाडाच्या फांदीचा आधार घेतल्यामुळे बोट पलटली नाही. तसेच योग्य वेळ साधून मी तेथून तात्काळ पळ काढला. पण मगरीनं माझा दूरपर्यंत पाठलाग केला.

एनबीसी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत, जॉयस म्हणाले की, मगरीला पाहिल्यानंतर मी बोट वेगानं चालवायला सुरूवात केली. वेगामुळे माझी नाव पलटली असती. पण देवाच्या कृपेमुळे असं काही झालं नाही. मला आजही तो थरारक अनुभव आणि दिवस आठवणीत आहे. मगरीनं संपुर्ण ताकदीनं बोटीवर हल्ला केला होता. या हल्ल्यामुळे बोटीचं संतुलन बिघडलं अन् नदीत पडता पडता वाचलो. पाण्यातूनही मगरीनं दोन-तीनदा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण मी संधी मिळताच तेथून पळ काढला.

या थरारक अनुभवाच्या व्हिडीओल नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे. YouTubeवर या व्हिडीओला सहा लाखांपेक्षा जास्त जणांनी पाहिलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-07-2020 at 11:14 IST