मगरमिठी! महाकाय मगरीने मारली महिलेला घट्ट मिठी आणि…बघा Viral Video

हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे.

alligator hugs women
व्हायरल व्हिडीओ (फोटो: @thereptilezoo / Instagram )

काही लोकांना प्राण्यांबद्दल प्रचंड आत्मीयता असते. ते त्यांना कुटुंबातील सदस्याप्रमाणे वागवतात. मात्र, अनेकवेळा अशी घटनाही घडली आहे, ज्यामुळे लोकांना धक्का बसला आहे. त्यामुळे लोकांना अनेकदा प्राण्यांपासून अंतर ठेवण्यास सांगितले जाते. कारण, कधीही काहीही होऊ शकते. पण एका व्हायरल व्हिडीओमध्ये एक मगर महिलेला मोठ्या आनंदाने मिठी मारत होती. त्यानंतर काय झाले ते पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल आणि हसूही येईल. या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लोक त्यावर केमेंट करत आहेत.

नक्की काय झाले?

मगर किती धोकादायक आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्हाला असे काही पाहायला मिळणार आहे, ज्यावर विश्वास ठेवणे कठीण जाईल. कॅलिफोर्नियातील सरपटणाऱ्या प्राणीसंग्रहालयात एका केअरटेकरला एक मादी मगरीने जबरदस्तीने मिठी मारली. पण, ती मगरीला मिठी मारत असताना तिला काहीतरी जाणवते, ती मगरीला पाहण्यासाठी दूर करते तेव्हा ती पाहून थक्क होते आणि थेट म्हणते, ‘अरे देवा, काय झाले?’ तुम्ही पण बघा काय झालं?

( हे ही वाचा: व्यक्तीने AK47 ने टेस्ला कारवर झाडल्या गोळ्या; पुढे काय झालं बघा व्हायरल व्हिडीओमध्ये )

( हे ही वाचा: जेसीबीवरून वधू-वराने घेतली एन्ट्री आणि…, व्हिडीओ बघून तुम्हालाही हसू आवरणार नाही )

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला आहे. हा व्हिडीओ ‘thereptilezoo’ नावाने इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. हा मजेशीर व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. तर एक लाख ४६ हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडीओला लाईक केले आहे. व्हिडीओचा आनंद घेताना यूजर्स खूप मजेदार प्रतिक्रियाही देत ​​आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Crocodile huge crocodile hits woman tight hug and watch viral video ttg

Next Story
Video: औषधाची गोळी समजून तरुणीने चुकून एअरपॉड गिळला अन्…; रडत रडत सांगितली आपबिती
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी