Crocodile Viral Video : निसर्गात अनेकदा अशा काही चमत्कारिक गोष्टी घडत असतात की पाहून आश्चर्यचकित व्हायला होते. काही गोष्टी पाहून तर डोळ्यांवर विश्वास बसत नाही. निसर्गाचे अनोखे चमत्कार अनेकदा माणसांबरोबर प्राण्यांसाठीही आव्हानात्मक ठरतात. सध्या निसर्गातील अशाच जीवघेण्या स्थितीचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. व्हिडीओमध्ये गोठलेल्या तलावाच्या तळाशी एका मगरीचा जगण्यासाठी कसा संघर्ष सुरू आहे हे दिसून येते.

व्हिडीओमध्ये हाडं गोठवणाऱ्या थंडीत तलावातील पाणीही पूर्णपणे गोठलं आहे, पण या गोठलेल्या पाण्यात एका मगरीने कसेबसे स्वत:ला जिवंत ठेवले आहे.

Crocodiles nanded news in marathi
दगडांच्या कपारीतून मगर पकडली
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Tiger cub and wild boar fall into same well after chase goes wrong in MadhyaPradesh's Seoni shocking video
“जास्त गर्व करू नये कारण…पैसा, सौंदर्य, ताकद प्रत्येकाला मर्यादा” वाघावर काय वेळ आली पाहाच; VIDEO व्हायरल
विषारी अजगराबरोबर नको ती स्टंटबाजी! पायाने १५ फुट सापाला पाण्यातून बाहेर काढतोय हा माणूस, पण का? काळजाचा थरकाप उडवणारा Video Viral
Giant python shocking video
शिकारीसाठी महाकाय अजगर कालव्यात शिरला अन् झाला गेम; पाण्यात गुदरमला अन्…; धडकी भरवणारा VIDEO VIRAL
Shocking video of snake attacks frog but frog saves himself animal hunting video viral on social media
जिथे भीती संपते तिथे आयुष्य सुरू होतं! सापाने बेडकाला तोंडात धरलं अन् पुढच्याच क्षणी डाव पलटला, पाहा थरारक VIDEO
Woman dressed as mermaid dancing Inside water tried to eaten by giant fish shocking video
बापरे! महिला पाण्यात जलपरी बनून परफॉर्मन्स करत होती तितक्यात समोरून आला मासा, तोंडात पकडलं डोकं अन्…VIDEO पाहून धक्का बसेल
video shows Monkey And Man ate from one plate
VIDEO : विश्वासच बसेना! जेवताना ताटापुढे येऊन बसले माकड अन्… पुढे जे घडले, ते पाहून तुम्हीही कराल कौतुक

थंडीमुळे गोठलेल्या तलावात मगर शांतपणे बसली अन्…

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, थंडीमुळे गोठलेल्या तलावात एक मगर शांतपणे बसली आहे. ती अजिबात काहीच हालचाल करत नाहीये, सुरुवातीला पाहताना मगर जिवंत आहे की नाही असा प्रश्न पडला. पण, काही वेळाने मगरीने थोडी हालचाल केली, त्यावरून ती जिवंत असल्याचे लक्षात आले. तिच्या संपूर्ण शरीरावरील पाणी बर्फासारखं गोठलं होतं, पण या गोठलेल्या पाण्यातही ती जिवंत कशी काय असा सवाल आता उपस्थित होत आहे. श्वास गुदमरू नये म्हणून मगरीने बर्फातून आपले नाक बाहेर काढले आहे, ज्यामुळे ती नीट श्वास घेऊ शकते.

पुणे पोलीस आहात कुठे? भररस्त्यात जोडप्याने अक्षरश: मर्यादा ओलांडली? VIDEO पाहून संतापले लोक

दरम्यान, याचे उत्तर व्हिडीओच्या कॅप्शनमध्येच देण्यात आले आहे. कधीकधी मगरींना थंड हवामानाचा सामना करावा लागतो आणि त्या बर्फाखाली अडकलेल्या दिसतात. यातून सुटण्यासाठी मगरी ब्रुमेशनच्या अवस्थेत प्रवेश करतात. हायबरनेशनप्रमाणेच ब्रुमेशन ही जगण्याची स्थिती आहे, जी सरपटणाऱ्या प्राण्यांना कठोर, थंड हवामान सहन करण्यास मदत करते.

crocodile froze while lying in the lake

दरम्यान, हा व्हिडीओ पाहून आता लोकही अवाक् झाले आहेत. अनेकांनी कमेंट्स करत या व्हिडीओवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. एका युजरने लिहिले की, हे अप्रतिम दृश्य फक्त निसर्गच दाखवू शकतो. दुसऱ्याने लिहिले की, अशा जीवघेण्या परिस्थितीत असूनही निसर्ग या प्राण्यांना जगण्याचे बळ देतो. तिसऱ्याने लिहिलेय की, ही मगर आता बर्फ वितळल्यानंतरच बाहेर पडू शकेल.

Story img Loader