मगर हा जगातील सर्वात धोकादायक जलचरप्राण्यांपैकी एक मानला जातो. पाण्यात असताना त्याच्या ताकदीचा अंदाज लावता येत नाही. पण मगर ही मोठ्या प्राण्यासाठी देखील धोकादायक ठरु शकते, मग तो प्राणी वाघ असोत किंवा मग सिंह. पाण्यात मगरीसमोर कोणाचं काहीच चालणार नाही. पण तुम्हाला जर सांगितलं की अशा या मगरीला एक तरुणी मसाला लावून भाजून खातेय, यावर तुमचा विश्वास बसेल? हे ऐकताना थोडं धक्कादायक आणि आश्चर्यकारक वाटत आहे. पण हे खरं आहे, याबद्दलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मगरीला खाण्याचा तुम्ही कधी विचार केलाय का? बरेच असे लोक आहेत जे आवडीनं मगर खातात. त्यांचे व्हिडीओ, फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुणी मगरीचं शेपूट खासून धुते. नंतर त्याची त्वचा काढते आणि मांसचे तुकडे करते. मांसाला वेगवेगळ्या पदार्थामध्ये मिक्स करुन शिजवते. नंतर त्याला तेलात फ्राय करते आणि चवीनं खाते. हा व्हिडीओ पाहून अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहे. हे सगळं बघतानाच अंगावर काटा येतो अशाही प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> तरुणाचे Apple AirPods गटरात पडले; क्षणाचाही विचार न करता थेट नाल्यात मारली उडी अन्…खतरनाक VIDEO व्हायरल
परंतु व्हिडीओ पाहिल्यानंतर, तुम्हाला नक्की उलटी होईल इतकं ते सगळं किळसवाणं आहे.हा व्हिडीओ कधी आणि कुठे शूट करण्यात आला याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत होता. हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर ting_tong80 नावाच्या युजरने त्याच्या अकाउंटवरून शेअर केला आहे. आता हेच पाहायचं राहिलं होतं असंही काही जण म्हणत आहेत.