Croma Everything Apple Sale : ॲपल कंपनीने ९ सप्टेंबर २०२५ रोजी iPhone 17 लॉन्च केला आहे. पण, आयफोनची किंमत जास्त असल्यामुळे आपण सगळेच हा फोन घ्यायचा की नाही याचा विचार करत बसतो. पण, आता तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही आहे. कारण – सध्या १ मे पासून Croma च्या ‘Everything Apple’ सेल सुरु असून या सेलच्या दुसरा टप्पा (Phase 2) सुरू आहे. यावेळी, केवळ थेट किंमत कपात करण्याऐवजी डिस्काउंट देऊन ॲपलची जास्त किंमतीची उत्पादने अधिक परवडणारी बनवण्यावर भर देण्यात आला आहे.

हा सेल १ पासून सुरु झाला असून १६ मे पर्यंत सुरू राहील आणि यामध्ये iPhone, MacBook, iPad, AirPods आणि Apple Watch यांसारख्या उत्पादनांवर विशेष ऑफर्स उपलब्ध असतील. या सेलचे मुख्य आकर्षण म्हणजे iPhone 17, जो आता ४४ हजार ७६८ च्या जबरदस्त किंमतीत (effective price) उपलब्ध आहे. जी त्याच्या मूळ लाँच किंमतीपेक्षा खूप जास्तच कमी आहे. पण, ही किंमत थेट मिळत नाही; तर ती एक्सचेंज ऑफर्स, बोनस आणि ॲपल इकोसिस्टमशी संबंधित ऑफर्समधून मिळणार आहे.

iPhone 17 वर काय ऑफर असणार ?

iPhone 17 (256GB) ची मूळ किंमत ८२ हजार ९०० असून तुम्हाला या सेलमध्ये फक्त ४४ हजार ७६८ रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. पण, आयफोन इतक्या स्वस्तात खरेदी करण्यासाठी तुम्हाला एकाच वेळी अनेक ऑफर्सचा लाभ घ्यावा लागेल. तेही समजून घेऊया…

जुन्या स्मार्टफोनवर २३ हजार ५०० पर्यंतचे एक्सचेंज व्हॅल्यू

  • ८ हजारपर्यंतचा अतिरिक्त एक्सचेंज बोनस
  • १ हजार ६५८ पर्यंतचे डिस्काउंट कूपन
  • ४ हजार ९७४ पर्यंतचे ‘Tata Neu Coins’ चे फायदे

याचा अर्थ असा की, आयफोन ४४ हजार ७६८ या रुपयांना देण्याआधी जुन्या डिव्हाइसची स्थिती आणि अतिरिक्त लाभांसाठीची तुम्ही पात्र आहात की नाही हेही तपासलं जाईल.

iPhone वरील इतर ऑफर्स

iPhone 17 बरोबरच, Croma जुन्या मॉडेल्सवरही डिस्काउंट देत आहे…

  • iPhone 15 (128GB) – ३६ हजार ८९१ रुपये
  • iPhone 16 (128GB) – ४० हजार ०४१ रुपये

या किंमतींमध्येही एक्सचेंज बोनस, कार्ड ऑफर्स आणि कूपन्सचा समावेश असणार आहे.

या सेलचे वेगळेपण काय आहे?

थेट डिस्काउंट देण्याऐवजी, Croma या सेलमध्ये वेगवेगळ्या ऑफर्स आणि फायदे एकत्र करून किंमत कमी करत आहे.

  • एक्सचेंज ऑफर्स
  • अतिरिक्त बोनस
  • बँक आणि कार्ड-आधारित सवलती
  • टाटा न्यू कॉइन्स रिवॉर्ड्स
  • ईएमआय पर्याय आणि विद्यार्थ्यांसाठी लाभ

म्हणजेच, एखाद्या वस्तूची अंतिम किंमत ही डिस्काउंट, बँक ऑफर, एक्स्चेंज ऑफर, कॅशबॅक अशा अनेक गोष्टी मिळून ठरवली जाणार आ

iphone 17

कुठून खरेदी करू शकता?

‘एव्हरीथिंग ॲपल सेल २’ १ मे ते १६ मे पर्यंत क्रोमा स्टोअर्स आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर सुरू राहील. स्टॉक, शहर आणि एक्सचेंज व बँक ऑफर्ससाठीच्या पात्रतेनुसार किमती बदलू सुद्धा शकतात.