शेतपिकांचे वन्य प्राण्यांकडून मोठ्या प्रमाणात नुकसान केले जाते. त्यात अनेक ठिकाणी रानडुक्कर, हत्ती, वानर आदी प्राण्यांकडून हातातोंडाशी आलेल्या उभ्या पिकाची एका रात्रीत नासधूस केली जाते. संपूर्ण मशागत करून लेकराप्रमाणे सांभाळलेल्या पीक अशा रीतीने उद्ध्वस्त होत असल्याने शेतकरीवर्ग मेटाकुटीला येतो. आतापर्यंत तुम्ही हत्ती, रानडुक्कर, वानर यांच्याकडून पिकांची नासधूस केली गेल्याचे पाहिले असेल; पण कावळ्याने अर्ध्या शेताची नासधूस केल्याचे कधी पाहिले आहे का? नसेल तर हा व्हायरल व्हिडीओ पाहाच.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रानटी प्राण्यांपासून पिकाचा बचाव करण्याकरिता शेतकरी वेगवेगळे पर्याय करून पाहतात. पण, त्यानंतरही काही प्राणी-पक्षी या पर्यायांना न जुमानता पिकांची नासधूस करतात. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओत कावळा चोचीने एका शेतातील एकेक रोपटे उपटून फेकून देतो. सलग लावलेली रोपे तो उपटून टाकतो. अशा प्रकारे त्याने अर्ध्या शेतातील पिकाची नासधूस केली. पण, तो असे का करतोय, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

या व्हिडीओवर आता युजर्स वेगवेगळ्या भन्नाट कमेंट्स करीत आहेत. शेतात शेणखत टाकले असेल. त्यामुळे किडे खाण्यासाठी तो आला असेल, असे अनेकांनी म्हटले आहे. तर काहींनी तो पाण्याच्या शोधात इथे आला असेल आणि त्याला या रोपट्यांखाली पाणी सापडेल, असे वाटले असेल. तर तो बहुतांशी पोटाची खळगी भरण्यासाठी असे करीत असेल असे एकाने म्हटलेय. तर एकाने, बिचाऱ्या शेतकऱ्याचे कष्ट लक्षात घेऊन, असा व्हिडीओ करण्यापेक्षा त्या कावळ्याला हुसकावले पाहिजे होते, असे म्हटले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crow herds huge damage to agricultural crops video goes viral sjr
Show comments