Premium

Video : बाजारात रस्त्यावर पडलेले‌ हिरे उचलण्यासाठी लोकांची गर्दी, सत्य कळताच झाले‌ निराश…

गुजरातची आर्थिक राजधानी सुरतमध्ये हिरे रस्त्यावर पडले आहेत अशी अफवा पसरली आणि अनेक नागरिक हे ऐकताच रस्त्यावर हिरे शोधण्यास सुरवात करायला लागले.

Crowd of people to pick up diamonds lying on the street in the market
(सौजन्य:ट्विटर/@kalpeshpraj80) बाजारात रस्त्यावर पडलेले‌ हिरे उचलण्यासाठी लोकांची गर्दी, सत्य कळताच झाले‌ निराश…

गुजरातची आर्थिक राजधानी असलेल्या सुरतला डायमंड सिटी असे म्हणतात. सुरतमध्ये महिधपुरा आणि वराछा परिसरामध्ये हिऱ्यांच्या दुकानाची बाजारपेठ आहे. तिथे रस्त्यावर बसून हिऱ्यांची खरेदी आणि विक्री केली जाते. तर आज सोशल मीडियावर याच परिसरातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जिथे हिरे रस्त्यावर पडले आहेत अशी अफवा पसरली आणि अनेक नागरिक हे ऐकताच रस्त्यावर हिरे शोधण्यास सुरवात करायला लागले. पण, अनेक तास हिऱ्यांचा शोध घेणाऱ्या लोकांना यामागील सत्य कळाल्यानंतर अनेकजण निराश झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल व्हिडीओ गुजरातची आर्थिक राजधानी सुरतचा आहे. काही दुचाकीस्वार रस्त्यावरून जाताना दिसत आहेत, तर रस्त्याच्या अगदी मधोमध आणि रस्त्याच्या कडेला अनेकजण रस्त्यावर काहीतरी शोधताना दिसत आहेत. तर प्रकरण असे आहे की, डायमंड सिटी सुरतमध्ये रस्त्यावर हिरे पडले आहेत अशी अफवा पसरवण्यात आली होती आणि याच कारणाने अनेकजण रस्त्यावर हिरे शोधायला लागले आणि एकच खळबळ उडाली. अनेक नागरिक रस्त्यावर नेमकं काय शोधत आहेत ? याचे कारण अनेक दुचाकीस्वारांना माहीत नसूनही ते आश्चर्याने हिरे शोधणाऱ्यांकडे बघताना दिसून येत आहेत. तसेच काहीजण ही घटना स्वतःच्या मोबाईलमध्ये शूट करून घेत आहेत. रस्त्यावर हिरे शोधणाऱ्या नागरिकांची गर्दी एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघाच.

हेही वाचा… तरुणाचे Apple AirPods गटरात पडले; क्षणाचाही विचार न करता थेट नाल्यात मारली उडी अन्…खतरनाक VIDEO व्हायरल

व्हिडीओ नक्की बघा :

सत्य कळताच सगळेच झाले निराश :

रस्त्यावर हिरे पडले आहेत हे ऐकताच बाजारात गोंधळ सुरू झाला आणि आरडाओरड सुरू झाली. लोकांनी नीट रस्त्यावर पाहिलं तर लहान हिरे खरचं पडले होते. त्यानंतर पडलेले हिरे गोळा करण्यासाठी रस्त्यावर अनेकांची गर्दी जमली. पण, रस्त्यावर पडलेले हिरे शोधण्यात अनेक लोकांनी बराच वेळ फुकट घालवला. कारण रस्त्यावर पडलेले हिरे खोटे असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच हे खाणीतले हिरे नसून लॅबमध्ये तयार करण्यात आलेले हिरे आहेत, ज्यांना फारशी किंमत नसते. हिरे शोधण्यासाठी वेळ देणारे अनेक नागरिक हे ऐकून निराश झाले.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @kalpeshpraj80 या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, रस्त्यावर पडलेले हिरे गोळा करण्यासाठी सर्वसामान्य नागरिक हातातील काम सोडून हिरे शोधण्यात व्यस्त झाले आहेत. प्रत्येकजण बारकाईने हिरे शोधत आहेत. तसेच या दरम्यान एका व्यक्तीने हा व्हिडीओ शूट करून सोशल मीडियावर शेअर केला आहे; जो सध्या खूपचं व्हायरल होत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Crowd of people to pick up diamonds lying on the street in the market asp

First published on: 25-09-2023 at 19:10 IST
Next Story
इरशाळवाडी पीडितांना गणपतीच्या देखाव्याद्वारे वाहण्यात आली भावनिक श्रद्धांजली; पाहा Video