scorecardresearch

Premium

आयपीएलदरम्यान जखमी गुडघ्यावर पट्टी बांधून मैदानात उतरला MS Dhoni, व्हिडिओ होतोय व्हायरल

चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

csk captain ms dhoni strapping his knee during ipl 202
व्हायरल होतोय धोनीची व्हिडिओ (

MS Dhoni Viral Video: चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल 2023 चे विजेतेपद पटकावले. या संघाने अंतिम फेरीत गुजरात टायटन्सचा पराभव करून पाचव्यांदा ट्रॉफी जिंकली आहे. सगळीकडे सामन्याच्या विजयाची चर्चा होत असताना दुसरीकडे सोशल मीडियावर एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी या व्हिडिओमध्ये दिसत आहे. खरे तर, या व्हिडिओमध्ये हे स्पष्ट दिसत आहे की, महेंद्रसिंग धोनी जखमी गुडख्यावर पट्टी बांधत आहे. व्हिडिओ पाहून गुडघ्याला दुखापत झाली असूनही कॅप्टन कूल धोनी मैदानात उतरला असल्याचा अंदाज बांधला जात आहे.

व्हायरल होतोय धोनीचा व्हिडिओ

सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. balltamperrer या अकाउंटवरून ट्विटरवर पोस्ट केलेल्या या व्हिडिओत महेंद्र सिंह धोनी आपल्या जखमी गुडघ्यावर पट्टी बांधताना दिसत आहे. हा व्हिडिओ गुजरात टाइटन्स विरोधी सामन्याच्या पूर्वीचा असल्याचे मानले जात आहे. हा व्हिडिओ नक्की कोणत्या सामन्याच्या आधीचा आहे याबाबत अद्याप माहिती उपलब्ध नाही पण दुखापत झाली असतानाही धोनी आयपीएलदरम्यान मैदानावर उतरला आहे हे मात्र यावरुन स्पष्ट होते. सोशल मीडियावर मंहेद्रसिंह धोनी यांचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. याशिवाय सोशल मीडियावर सातत्याने कमेंट्स टाकून महेंद्र सिंह धोनीच्या समर्पणाचे कौतूक करत आहे.

हेही वाचा – ”ये दोस्ती हम नहीं तोडेंगे!” सायकल तुटेल पण मैत्री नाही, चिमुकल्यांनी केला भन्नाट जुगाड; व्हिडिओ पाहून पोटधरून हसाल

व्हिडिओवर मिळाल्या समिश्र प्रतिक्रिया

एका युजरने व्हिडिओवर कमेंट केली की, तो आपल्या शरीराचा असा छळ का करत आहे? त्याने आता निवृत्ती घ्यावी आणि इतर खेळाडूंना संधी द्यावी. होय, चाहत्यांचे त्याच्यावर प्रेम आहे, परंतु हे त्याच्या आरोग्याच्या किंमतीवर असू नये. मला वाटतं CSK फ्रँचायझी त्याला दरवर्षी चालू ठेवण्यास भाग पाडत आहे.”

तर दुसऱ्या एका युजरने कमेंट केली की, ”मी CSK चा चाहता आहे पण MS धोनीच्या निवृत्तीमुळे मी आनंदी आहे की त्याने आपल्या देशासाठी आणि CSK साठी खूप काही केले आहे, त्याला csk आणि चाहत्यांसाठी संघर्ष करावा लागणार नाही शेवटी आपल्याला त्याच्या वयाचा आदर करावा लागेल, कृपया त्याला आनंदाने निवृत्त होऊ द्या. मी त्याला असे पाहू शकत नाही. ”

तर काहींनी या व्हिडिओवर त्याला ट्रोल देखील केले. एका यूजरने व्हिडिओ पाहून म्हटले की, ”जमत नसेल तर मग खेळू नको.”

हेही वाचा – कधीही पाहिला नसेल असा जुगाड! कारच्या सेफ्टीसाठी पठ्ठ्याने लावली अतरंगी फ्रेम! पाहा Video

महेंद्र सिंह धोनी लवकर मुंबईच्या कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये जाणार?

एबीपीन्युजने दिलेल्या वृत्तीनुसार, महेंद्र सिंह धोनी लवकरच कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये जाणार असल्याचे सांगितले जात आहे. कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये महेंद्र सिंह धोनीला काही तपासण्या लागतील. कॅप्टन कूल या आठवड्यात मुंबईला जाऊ शकतो, ज्यानंतर त्याला या तपासण्या करव्या लागतील.

विशेष गोष्ट म्हणजे महेंद्र सिंह धोनीला आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी कॅप्टन म्हणून ओळखले जाते. त्याशिवाय धोनीच्या कॅप्टनसीमध्ये भारतीय टीम टी ट्वेन्टी वर्ल्ड कपसह २०२२मध्ये वन डे वर्ल्डकप जिंकला आहे. महेंद्र सिंग धोनीच्या कॅप्टन्सीमध्ये चेन्नई सुपर किंग्जने ५ वेळा आयपीएल विजेदपद जिंकण्याचा किताबदेखील आपल्या नावे केला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Csk captain ms dhoni strapping his knee during ipl 2023 twitter video viral on social media snk

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×