Viral Video : सध्या देशात आयपीएल सुरू आहे त्यामुळे दरदिवशी क्रिकेटच्या मैदानावरील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर येतात. आयपीएलमधील सर्वाधिक लोकप्रिय संघ म्हणून ओळखला जाणारा चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येतो. सध्या चेन्नई सुपर किंग्सच्या चाहत्यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये हे चाहते चक्क चीअरलिडर्सना डान्स शिकवताना दिसले. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. या तरुण चाहत्यांनी करून दाखवलेल्या डान्स स्टेप्स चीअरलिडर्सनी हुबेहूब केल्या. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स च्या सामन्यादरम्यान आहे.

व्हायरल व्हिडीओ

चेन्नई सुपर किंग्सचे चाहत्यांचे अनेक व्हिडीओ समोर येतात. अशातच चीअरलिडर्सना डान्स शिकवणाऱ्या तरुण चाहत्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये स्टेडियममध्ये मॅच बघणाऱ्या चार तरुणांनी धोनीची सात नंबरची जर्सी घातली आहे आणि डान्स करताना दिसत आहे. त्यांच्यासमोर चीअरलिडर्स सुद्धा डान्स करताना दिसत आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की हे तरुण काही युनिक डान्स स्टेप्स करताना दिसत आहे आणि त्याच डान्स स्टेप्स चीअरलिडर्स सुद्धा कॉपी करताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून तु्म्हीही थक्क होईल. या तरुणांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सध्या हा व्हिडीओची सगळीकडे चर्चा आहे.

हेही वाचा : Mumbai Rain: मुंबईतील वादळी पावसानंतर नागरिकांनी शेअर केले अंगावर काटा आणणारे व्हिडीओ, नेटकरी म्हणाले, “मुंबईने कधीच असे वादळ…”

पाहा व्हिडीओ

हेही वाचा : VIDEO : काय ती अदा, काय ते भुरभुरे केस! मुंबई लोकलमध्ये ‘गुलाबी साडी’ गाण्यावर तरुणाचा जबरदस्त डान्स, पाहून प्रवासी थक्क

whistlepoduarmy and cskfansofficial या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “सुपरफॅन्स आमच्या चीअरलीडर्सना डान्स स्टेप्स शिकवत आहेत. टॅग करा ज्यांना डान्सची आवड आहे. या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “फक्त आयुष्यात एवढा आत्मविश्वास असायला पाहिजे.” तर एका युजरने लिहिलेय, “सीएसके चाहते आणि चीअर गर्ल्स यांची कधीही न संपणारी प्रेम कहाणी आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “मॅच बघायला आला आहात की चीअर गर्ल्सबरोबर डान्स करायला” अनेक युजर्सनी हसण्याचे आणि हार्ट चे इमोजी शेअर केले आहेत.