पुणे आणि पुणेरी पाट्यांची चर्चा जगभर होते. ‘कमाल शब्दात किमान अपमान’ अशी ओळख अनेकजण पुणेकरांची सांगतात. ‘पुणेरी पाट्या’ या अनेकदा लोकांना ‘ काय करावे आणि काय करू नये’याबाबत पुणेरी शैलीत सुचना सांगण्याची पद्धत आहे. ही शैली प्रत्येक पुणेरी व्यक्तीकडे आहे. पुण्यात ठिक-ठिकाणी तुम्हाला पुणेरी पाट्या पाहायला मिळतील ज्यावर खोचक शब्दातील सुचना लिहिलेली दिसेल. काही लोक असतात ज्यांना सरळ शब्दात सांगितलेल्या सुचना आणि नियमांचे पालन करता येत नाही अशा लोकांना खोचक शब्दात सुचना द्यावी लागते. ही सुचनाच अशी असते जी वाचल्यानंतर व्यक्ती नियम मोडणार नाही कारण नियम मोडला तर पुणेकरांची खोचक शब्दातील त्यांच्यावर लागू होते. उदाहरणार्थ, अनेकदा लोकांना सांगितले जाते की, गेटसमोर गाड्यांची पार्किंग करू नये पण तरीही लोक तिथेच गाडी पार्क करून जातात. अशा बेशिस्त लोकांना शिस्त लावण्याचे पुणेकरांना चांगलेच समजते. अशा वेळी पुणेकर गेटवर फक्त एक पाटी लावतात, “मी गाढव आहे. मी गेटसमोर गाडी लावणार” पाटी वाचून कोणत्याही व्यक्तीची त्या गाडीसमोर गाडी लावण्याची हिंमत होणार नाही. एवढचं काय अनेकदा “गाडी गेटसमोर लावल्यास चाकातील हवा सोडण्यात येईल अशी सुचना लिहिलेली पुणेरी पाटी लावतात. एवढं सांगूनही जर कोणी ऐकले नाही तर पुणेकर त्या गाडीच्या चाकातील हवा सोडण्यास मागे पुढे पाहत नाही. काही दिवसांपूर्वी अशाच एका काकांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता ज्यांनी गेटसमोर कार पार्क केल्यामुळे त्याच्या चाकातील हवा काढून टाकली होती.

पुणेरी पाटी चर्चेत

पुण्यात पार्किंगची मोठी समस्या आहे त्यामुळे लोक जिथे जागा मिळेल तिथे गाडी पार्क करून निघून जातात पण त्यामुळे इतरांना त्रास होऊ शकतो याचा विचार करत नाही. बेशिस्त लोकांना पुणेकर पुणेरी शैलीतच उत्तर देतात. त्यामळे पुण्यात पार्किंगसंबधित अनेक ठिकाणी पुणेरी पाट्या पाहायला मिळतात. सध्या अशीच एक हटके पुणेरी पाटी चर्चेत आली आहे. बेशिस्त वाहनचालकांसाठी लावण्यात आलेली पुणेरी पाटी वाटून तुम्हाला तुमचे हसू आवरणार नाही.

हेही वाचा – पुणेकरांचा नाद करायचा नाही! ‘पीएमपीएल’ बस चालकाने बेशिस्त कार चालकाला घडवली अद्दल, Video होतोय Viral

शापीत पार्किंग क्षेत्र

व्हायरल पुणेरी पाटीवर शापीत पार्किंग क्षेत्र असे लिहिले आहे आणि त्यासमोर नो पार्किंगचे चिन्ह दिसत आहे. त्यापुढे लिहिले आहे की,” कोपरा असल्याने गाडी हमखास घासली जाते. चोर गाडी उचलतात. टायरमधील हवा कमी होते. विश्वास नसल्यास अनुभव हीच खात्री”
आता ही पुणेरी पाटी वाटून कोणी त्या ठिकाणी आपली गाडी पार्क करण्याची हिंमत करणार नाही आणि केलीच तर पुढे जे होईल त्याची पूर्वसुचना आधीच या पाटीमध्ये सांगितले आहे. म्हणतात ना, “शाहण्यांना शब्दांचा मार.” ही म्हण येथे लागू होतील. जे लोक ही पाटी वाचून गाडी पार्क करणार नाही ते शहाणे ठरतील.

हेही वाचा – “उगाच पुण्याच्या पाट्या जगभर प्रसिद्ध नाहीत!” नो पार्किंगमध्ये गाडी लावणाऱ्यांना पुणेरी शैलीत टोला, पाहा पुणेरी पाटी

व्हायरल पुणेरी पाटी सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आली आहे. तुम्हाला ही पुणेरी पाटी कशी वाटली?