कृष्णजन्माष्टमी हा हिंदुधर्मातील महत्त्वाचा सण आहे. २६ ऑगस्ट रोजी देशभरात भगवान श्री कृष्ण जन्म जयंती उत्साहात साजरी केली आहे. परंपरेनुसार रात्री १२ वाजता श्रीकृष्णाची पूजा करण्यात आली आहे. लाडक्या कृष्णासाठी दह्याचा नैवेद्य दाखवण्यात आला. कृष्ण जन्माष्टमीच्या दुसर्‍या दिवशी गोपाळकाला देखील जल्लोषात साजरा करण्यात आला. गोपाळकाला निमित्त गोंविदा एकत्र येऊ मानवी मनोरा उभारून उंच उंच दहीहंडी फोडण्यात आली आहे. याबरोबर शाळांमध्ये विद्यार्थी कृष्ण आणि राधाच्या वेशभूषा करून जातात. अशाच राधा कृष्णच्या वेशभूषेत नृत्य करणाऱ्या चिमुकल्यांचा गोंडस व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओने नेटकऱ्यांचे मन जिंकले आहे.

राधा कृष्णच्या वेशभुषेत चिमुकल्यांचे गोंडस नृत्य

व्हिडिओ एका शाळेतील दिसत आहे जिथे काही विद्यार्थी राधा कृष्णच्या वेशभूषेत आले आहेत. काही गणवेश परिधान केलेल विद्यार्थी जमिनीवर बसलेले दिसत आहे. दरम्यान मधोमध राधा कृष्णची वेशभुषेत दोन चिमुकले विद्यार्थी मैय्या यशोदा गाण्यावर नृत्य करताना दिसत आहे. चिमुकला कान्हाने हातात बासरी घेतली आहे तर चिमुकली राधाचे टुमके पाहून नेटकरी थक्क झाले आहत. दोघांचे गोंडस नृत्य पाहून नेटकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले आहे. व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओला ६ लाखांपेक्षा जास्त लोकांनी पसंती दर्शवली आहे.

pune vanchit Bahujan aghadi
शाळकरी मुलींशी अश्लील कृत्य प्रकरणात जप्त केलेली गाडी फोडली, वंचितच्या पदाधिकाऱ्यांसह नऊ जणांवर गुन्हा
ankita walawalkar reveals marriage plans and talk about future husband
अंकिताचा ‘कोकण हार्टेड बॉय’ कोण आहे? कोकणात करणार…
case against father, father abusing daughter,
मुंबई : पाच वर्षांपासून मुलीवर अत्याचार करणाऱ्या पित्याविरोधात गुन्हा
In Badlapur case accused Akshay Shinde Thane alleged encounter
चकमकी अखेर पोलिसांवरच का शेकतात?
arvind sawant replied to chandrasekhar bawankule
“उद्धव ठाकरेंना मविआतून बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे” म्हणणाऱ्या चंद्रशेखर बावनकुळेंना ठाकरे गटाचे प्रत्युत्तर; म्हणाले…
Asaduddin-Owaisi-1
ताजमहलच्या गळतीवरून असदुद्दीन ओवेसींचे भारतीय पुरातत्व विभागाच्या कार्यपद्धीवर ताशेरे; म्हणाले, “हे म्हणजे १० वीत नापास विद्यार्थ्याने…”
cbi arrests rg kar ex principal and psi
कोलकाता बलात्कार प्रकरणी महाविद्यालयाच्या माजी प्राचार्यासह पोलीस निरीक्षकाला अटक; पुराव्याशी छेडछाड केल्याचा आरोप
What Eknath Khadse Said About CD?
Eknath Khadse : एकनाथ खडसेंचा दावा, “मुलीशी चाळे करणाऱ्या भाजपा नेत्याची क्लिप…”

हेही वाचा – यमराज आणि चित्रगुप्त उतरले रस्त्यावर! खड्डांमुळे चाळण झालेल्या रस्त्यावर भुतांची घेतली लांब उडी स्पर्धा, Video Viral

व्हिडीओवर कमेंट करून अनेकांनीच चिमुकल्यांचे कौतूक केले आहे. व्हिडिओवर कमेंट करताना एकाने लिहिले की,” खूप खूप धन्यवाद मॅडम, तुम्ही एवढ्या लहान आणि लाडक्या मुलांना नृत्य शिकवता, राधा कृष्ण पृथ्वीवर आल्यासारखं वाटतं, मनापासून धन्यवाद.”

दुसरा म्हणाला, “राधे राधे , जय श्री कृष्ण जी , खुपच गोड आहे ही मुलं”

चिमुकल्यांचा राधा-कृष्ण वेशभूषेतील नृत्य पाहून अनेंकाना आपल्या बालपणीचे दिवस आठवले.