सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. कुठे डान्स, कुठे स्टंट, तर कुठे भांडणं. पण, काही व्हिडीओ असे असतात जे थेट मनाला भिडतात. विशेषतः लहान मुलांचे निरागस हसू, त्यांची बोबडी भाषा आणि गोंडस हावभाव पाहिले की आपोआप ओठांवर हसू येतं. असाच एक अतिशय गोड आणि निरागस व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओत दोन छोट्या चिमुकल्या मुली इतक्या क्यूट पद्धतीने बोलताना आणि गाताना दिसतात की पाहणारा क्षणभरासाठी सगळे टेन्शन विसरतो.

हा व्हायरल व्हिडीओ दोन लहान मुलींचा आहे, ज्या मम्मीपासून लपून मोबाईलवर रील बनवत आहेत. व्हिडीओची सुरुवातच खूप मजेशीर आहे. कॅमेऱ्यासमोर येऊन त्या अगदी निरागसपणे सांगतात, “गाईज, मम्मीशी लपून रील बनवत आहोत, आता तुम्ही आमचं गाणं ऐका.” हे ऐकताच व्हिडीओ पाहणाऱ्याला हसू आवरणं कठीण होईल. मुलांचा तो आत्मविश्वास आणि निरागसपणा या व्हिडीओची खरी ताकद आहे. व्हिडीओमध्ये एक छोटी मुलगी लाल दुपट्टा ओढून उभी आहे.

पाहा व्हिडीओ

ती मोठ्या आत्मविश्वासात सांगते, “पहिले मी गाणार, मग ही गाणार.” यानंतर ती तिच्या बोबड्या आवाजात “ला दुपट्टा” हे गाणं गाते. शब्द नीट जमत नाहीत, सूर बरोबर नसतो, पण तिचा आत्मविश्वास आणि चेहऱ्यावरचं निरागस हसू सगळं भरून काढतं.यानंतर दुसरी चिमुकली “आज की रात मजा हुस्न का” हे गाणं तिच्याच अंदाजात गुणगुणते. दोघींचा बोबडे उच्चार, गोंडस चेहऱ्यावरील भाव आणि लहानपणाची मजा पाहून हा व्हिडीओ अक्षरशः पुन्हा पुन्हा पाहावासा वाटतो.

या व्हिडीओखाली अनेकांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. कोणी म्हणतं, “इतका गोड आवाज आयुष्यात ऐकला नाही.” तर कोणी लिहितं, “हे बघून आजचा दिवसच छान गेला.”काही युजर्स म्हणतात, “बालपण म्हणजे हेच!” तर काही लोकांनी हा व्हिडीओ “आतापर्यंतचा सर्वात क्यूट व्हायरल व्हिडीओ” असंही म्हटलं आहे. हा व्हिडीओ chinkyminkyworlds या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला असून आतापर्यंत लाखो लोकांनी तो पाहिला आहे आणि त्याला हजारो लाईक्स व शेअर्स मिळत आहेत.