Cute Little Girl Dance Video : सोशल मीडियावर डान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात काही असे व्हिडीओ असतात, जे पाहून चेहऱ्यावर अलगद हसू येते, त्यात लहान मुलांचे डान्स व्हिडीओ म्हणजे हसू येतंच. कारण- अनेकदा ते अशा काही स्टेप्स किंवा हावभाव करतात, ज्यांचा आपण विचारच केलेला नसतो. सध्या अशाच एका चिमुकलीचा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. त्या व्हिडीओत चिमुकली ‘लाल लाल कलरची बांगडी’ गाण्यावर असे काही नखरेल ठुमके देत आहे की, ते पाहून तुमच्याही चेहऱ्यावर हसू येईल.
व्हायरल व्हिडीओत, दोन गोंडस चिमुकल्या स्टेजवर आपल्याच मस्तीत नाचताना दिसतायत. त्यात एका चिमुकलीने ड्रेस परिधान केलाय आणि दुसरीने साडी. त्यात ड्रेसमधील चिमुकली एका जागी उभी राहून एकेक स्टेप करतेय, तर साडीतील चिमुकली एकापेक्षा एक अशा काही स्टेप्स करतेय की, सर्वांच्या नजरा तिच्यावरच खिळल्या. तिची ती अदा, हातांच्या हालचाली आणि चेहऱ्यावरील गोड हावभाव पाहून नेटकरी तिच्या प्रेमात पडले आहेत. ‘लाल लाल कलरची बांगडी’ गाण्यावर ती नखरेल अदा दाखवीत नाचताना दिसतेय.
मोठ्या डान्सरलाही लाजवेल अशा आत्मविश्वासाने ही चिमुरडी ठुमके लगावतेय. व्हिडीओ पाहताना तुमच्या चेहऱ्यावर नकळत हसू येईल इतकी निरागसता त्यात आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी “किती गोड!” अशा स्वरूपाच्या कमेंट्स केल्यात.
चिमुकलीचा जबरदस्त डान्स
चिमुकलींच्या डान्सचा हा व्हिडीओ @lavyasasane’s नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, ज्यावर लोक एकापेक्षा एक सुंदर कमेंटस करतातय. एकाने लिहिले की, एक 2G ची स्पीड आहे, तर दुसरी 5G आहे. दुसऱ्याने लिहिले की, बेबी एकदम झक्कास. तिसऱ्या एकाने लिहिले की, खूपच छान डान्स केला आहे. शेवटी एकाने सल्ला दिला की, कॅमेरा नीट पकडायला पाहिजे होता, डान्सची सुरुवात भारी होती.
