सोशल मीडियावर कोणत्या गोष्टी व्हायरल होतील याचा काही नेम नाही. अनेकदा या व्हायरल व्हिडीओमधील कल्पना आपल्याला थक्क करणाऱ्या असतात. जगात असा विचार करणारीही मंडळी असतात? असा प्रश्न काही व्हिडीओ पाहिल्यावर आपल्याला पडतो. याच प्रकारातला व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये चक्क कुत्रीचे डोहाळजेवण आयोजित करण्यात आल्याचे दिसत आहे.
व्हायरल होणारा हा व्हिडीओ सुजा हाउसमेट या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये एका महिलेने चक्क तिच्या कुत्रीसाठी डोहाळेजेवण आयोजित केल्याचे दिसत आहे. फळं, पोशाख, मिठाई, फुलांचा हार असे अगदी परंपरेनुसार या कुत्रीचे डोहाळेजेवण आयोजित केले आहे. पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ.
आणखी वाचा: CCTV: साखळीचोरांना तिने चांगलीच अद्दल घडवली! बाइकवरून खाली पाडले अन्…; पाहा Viral Video
व्हायरल व्हिडिओ:
आणखी वाचा: Video: शिस्त म्हणजे शिस्त! कळपातून वेगळं धावणाऱ्या हत्तीच्या पिल्लांना हत्तीने कसा धडा शिकवला पाहा
या व्हिडिओतील अनोखे डोहाळेजेवण नेटकऱ्यांच्या पसंतीस पडले असून, प्राणीप्रेमींनी तर या संकल्पनेवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. या व्हिडीओला ५० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.