VIRAL VIDEO : क्लबमध्ये वडिलांनी मुलीसोबत इतका जबरदस्त डान्स केला की पाहणारे केवळ पाहतच राहिले!

बाप म्हणजे कठोर हृदयाचा असंच मानलं जातं. नेहमी मुला-मुलींना वडिलांचा धाक दाखवून त्यांच्या मनात भिती निर्माण केली जाते. मात्र हाच कठोर बाप चिमुकल्या लेकीसाठी कधी घोडा बनून पाठीवर तिला खेळवतो तर ती मोठी झाल्यावर तिचा जवळचा मित्र बनतो. असाच हा VIRAL VIDEO एकदा पाहाच…

dad-clubbing-daughter-virl-video
(Photo: Instagram/ betches)

नेहमी आईच्या मायेचं कौतुक केलं जातं. बाप म्हणजे कठोर हृदयाचा असंच मानलं जातं. नेहमी मुला-मुलींना वडिलांचा धाक दाखवून त्यांच्या मनात भिती निर्माण केली जाते. मात्र कितीही कठोर बाप का असेना आपल्या मुलीच्या बाबतीत मात्र तो कायम कोमल असतो. त्याची मुलगी बापाला जगातली सर्वात सुंदर परीप्रमाणेच असते. एरवी आयुष्यात कितीही खाचखळगे आले, कितीही संकटं आली, खांद्यावर कितीही जबाबदाऱ्यांचं ओझं असलं तरी आपल्या मुलीसाठी त्याच्या चेहऱ्यावर कायम प्रेमंच दिसून येत असतं. बाप-लेकीच्या नात्याचं शब्दात वर्णन करणं कठिण आहे. लहानपणी चिमुकल्या मुलीसाठी कधी घोडा बनून तिला आपल्या पाठीवर खेळवतो, तर कधी मुलगी मोठी झाल्यावर तिचा सर्वात जवळचा मित्र बनतो. अशाच एका कूल वडिलांचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तुम्ही बाप-लेकीच्या या अनोख्या बॉण्डिंगने भावुक व्हाल. हा व्हिडीओ एकदा नक्की पाहाच.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, वडिलांच्या जबरदस्त डान्स मूव्ह पाहून प्रत्येकजण हैराण होत आहेत. तालिया शुल्होफ नावाच्या या मुलीने तिच्या वडिलांना एका क्लबमध्ये नेलं होतं. त्यावेळी अगदी तरूणांनाही लाजवेल असा डान्स परफॉर्मन्स करताना तिच्या वडिलांचा व्हिडीओ तिने शूट केला. आपल्या मुलीसोबत क्लबमध्ये जाण्यासाठी शोभतील असे शर्ट, टी शर्ट आणि त्यावर चष्मा घालून अतिशय कूल अंदाजात या वडिलांनी आपल्या लेकीसोबत क्लबमध्ये एन्ट्री केली. जेव्हा या क्बलमध्ये जोरजोराने गाणे वाजू लागले त्यावेळी या कूल वडिलांना रहावलं नाही आणि आपल्या जबरदस्त डान्स मूव्सने साऱ्यांनाच आश्चर्यचकित करून सोडलं.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ स्पेनमधला आहे. तालिया शुल्होफ हिने आपल्या वडिलांना तिथल्या मॅड्रिक क्बलमध्ये घेऊन गेली होती. सुरूवातीला हे वडील डान्स फ्लोअरकडे निरिक्षण करताना दिसून येत आहेत. त्यानंतर पॅन्टच्या खिशात हात घालत हे वडील डान्स करण्यास सुरूवात करतात. लाडक्या लेकीसोबत क्लबींग एन्जॉय करण्याच्या आनंदात हे वडील आपल्या मोबाईलवर एक कामाचा मेल देखील सेंड करताना दिसत आहेत. अगदी मुलीच्या मित्रांप्रमाणेच वडील सुद्धा याच क्षणांना आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद करत सेल्फी काढताना दिसून येत आहेत. इतकंच काय तर आपल्या फॅमिलीसोबत कोक आणि टकीलेचे शॉट्स सुद्धा घेताना दिसून येत आहेत.

आणखी वाचा : PHOTOS : एका VIRAL VIDEO मुळे मालामाल झाला हा ‘Paragliding Man’; आज लाखोंमध्ये कमवतोय…

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ:

आणखी वाचा : एअरपोर्टवर आईचं स्वागत करण्यासाठी आलेल्या मुलाचंच चप्पलाने केलं स्वागत ! VIRAL VIDEO पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही

तालिया शुल्होफ हिने सांगितलं की, आमच्यासोबत क्लबींग एन्जॉय करत डान्स करत वडिलांना हे दाखवून द्याचचं आहे की ते सुद्धा समाजातील तरूण पिढीतील एक भाग होऊ शकतात. कूल वडिलांच्या जबरदस्त डान्स परफॉर्मन्सचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. वडिलांचा हा कूल अंदाज नेटकऱ्यांना इतका आवडलाय की आतापर्यंत या व्हिडीओला १० मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर १२ हजार लोकांनी या व्हिडीओवर कमेंट करत वडिलांच्या डान्सचं कौतुक केलंय.

आणखी वाचा : हा गडी कोलांट्या उड्या मारत गोण्या उचलतो…कामातही आनंद शोधला पाहिजे! VIRAL VIDEO एकदा पाहाच…

सोशल मीडियावर सध्या या कूल वडिलांची बरीच चर्चा रंगलीय. अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट करत ‘आदर्श पिता’ असल्याचं म्हटलंय. तर काही युजर्सनी एक वडिलांनी आपल्या मुलीसोबत क्लब एन्जॉय केलंय, यावर विश्वासच होत नसल्याचं व्यक्त केलंय. पण त्यांच्या या डान्सला चाहत्यांनी जास्त पसंती दिली आहे. एका नेटकऱ्याने दोघांचे कौतूक करत लिहले आहे की, जगातील सर्वात सुंदर बाप-लेकीचं नातं, असल्याचं म्हटलंय.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Dad clubbing daughter dance moves video viral madrid club tiktok google trending video today viral video on social media prp

ताज्या बातम्या