Dancing Dadi : ‘लॉलीपॉप लागेलू…’, आजीही स्वतःला आवरू शकली नाही; पाहा VIRAL VIDEO

या आजींचं वय झालं असलं तरीही त्यांनी इतका जबरदस्त डान्स केलाय की शेजारी उभ्या असलेल्या तरूण मुलीही उड्या मारत तिच्याजवळ येऊन डान्स करू लागल्या. पासष्ठी पार केलेल्या या आजींचा सॉलीड डान्स पाहून सारेच जण आश्चर्य झाले आहेत.

Dadi-dance-to-bhojpuri-song-lollipop-lagelu
(Photo: Instagram/ patrakaar_mustafa_07 )

सोशल मीडिया हे आजच्या काळात एक असं व्यासपीठ बनलंय जिथे रोज काहीतरी व्हायरल होत असतं. इथे कधी कधी असे व्हिडीओ व्हायरल होतात जे तुम्हाला भावूक करतात, कधी हसणं आवरणं कठीण होतं तर कधी खूप आश्चर्यचकित करून ठेवतात. सध्या असाच एक व्हिडीओ सर्वत्र गाजत आहे. हा व्हिडीओ एका आजीचा आहे. या आजींचं वय झालं असलं तरीही त्यांनी इतका जबरदस्त डान्स केलाय की शेजारी उभ्या असलेल्या तरूण मुलीही उड्या मारत तिच्याजवळ येऊन डान्स करू लागल्या. हा व्हिडीओ काही वेळात लाखो लोकांनी पाहिला आहे आणि जवळपास चाळीस हजार लोकांनी लाइक केलं आहे. आजींच्या या जबरदस्त डान्सने लोक हैराण झाले आहेत. या वयातही आजींचा उत्साह पाहून सारेच जण आश्चर्य झाले आहेत.

डान्स करायला प्रत्येकाला आवडतो. काही जणांचा अंगात तर गाणी ऐकताच संचारू लागतं. जिथं आहेत तिथंच ते थिरकायला सुरुवात करतात. असंच काहीसं या आजींसोबत झालंय. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा काही सेकंदाचा व्हिडीओ एका लग्नातला असल्याचं दिसून येतंय. वयाची जवळपास पासष्टी पार केलेल्या या आजींनी आपल्या जबरदस्त डान्सने डान्स फ्लोअरवर अक्षरशः आग लावली आहे. या व्हिडीओमध्ये आजी डान्स फ्लोअरवर उभ्या असलेल्या दिसून येत आहेत. इतक्यात लोकप्रिय भोजपूरी गाणं ‘लॉलीपॉप लागेलू’ हे गाणं वाजू लागतं. हे गाणं लागताच आजी मात्र स्वतःला आवरू शकल्या नाहीत आणि स्टेजवर अचानक असा डान्स करतात की बघणारे केवळ बघतच राहतात. म्हातारपण आणि तरुणपण वयात बरंच अंतर असलं तरी त्यांच्यातील जोश, उत्साहात किंचित मात्र फरक नाही, हे यावेळी आजींनी दाखवून दिलंय.

भोजपुरी गाण्यांवर या व्हायरल आजींच्या डान्स स्टेप्स पाहण्यासारख्या आहेत. अगदी बाजुला उभ्या असलेल्या तरूणींना देखील लाजवेल इतकी उर्जा या आजींमध्ये डान्स करताना दिसून येतेय. आजींच्या या गाण्यावर डान्स स्टेप्स पाहून शेजारी उभ्या असलेल्या तरूण मुलीही आजीच्या बाजुला स्टेजवर येतात आणि त्यांच्यासोबत डान्स स्टेप्स करताना दिसून येत आहेत. या डान्सिंग दादी स्टेजवर आपली कमर हलवत हटके डान्स करताना दिसून येत आहे. डान्सिंग दादीने सुंदर साडी नेसली आहे आणि ती साडीतच इतका जबरदस्त डान्स करत आहे. हा व्हिडीओ पाहणं खूप मजेदार आहे.

आणखी वाचा : रात्री अपरात्री कारमधून आल्या चोर आंटी आणि काय चोरी केली पाहा…VIRAL VIDEO पाहून तुम्ही पोट धरून हसाल!

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : तुम्ही कधी हत्तीची अशी हेअर स्टाईल पाहिलीय का? आंघोळीसाठी ४५ हजार रूपयांचा घेतो स्पेशल शॉवर

आजींच्या या डान्सचा व्हिडीओ patrakaar_mustafa_07 या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमधल्या डान्सिंग दादीने आपल्या सॉलीड डान्सनं नेटकऱ्यांना अक्षरशः वेड लावलंय. या व्हिडीओला आतापर्यंत ७ लाख जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर ३७ हजार लोकांनी या व्हिडीओ लाईक केलंय. या वयातही आजींचा असा जोश पाहून सर्वांनी त्यांना दाद दिली आहे. या वयात शरीराच्या विशेषतः गुडघेदुखीची तक्रार असतेच असते. पण आजींनी असा डान्स केला आहे की गुडघेदुखीसुद्धा त्यांना घाबरून पळून जाईल. काही जणांनी यावर मजेशीर कमेंटही केल्या आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Dadi ka dance woman dance video omg dance video viral video google trends today grandmother did hahakari dance on lollipop lagelu song girls also started dancing video trending on instagram prp

ताज्या बातम्या