यंदा सर्व उत्सव धुमधडाक्यात साजरे करण्यासाठी महाराष्ट्र सज्ज झाला आहे. काही दिवसात लाडक्या बाप्पाचं आगमन होईल आणि त्यापूर्वी दहीहंडीच्या उत्सवाने राज्य गजबजून जाणार आहे. कोणताही सण म्हणावा तर प्रत्यक्ष सेलिब्रेशनचा काही दिवस आधीच सोशल मीडियाला फेस्टिव्ह फिव्हर आधी चढतो. आता येऊ घातलेल्या दही हंडीचा उत्साह दर्शवणारा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात चक्क काही तरुण फुगडी व दहीहंडी एकत्र करून भलताचा गोपाळकाला करताना दिसत आहेत.

तुम्ही या व्हायरल व्हिडीओ मध्ये पाहू शकता की १२ लहान मुलांनी फुगडी खेळत गोल गिरकी घेतलीये. पण ही काही साधी फुगडी नाही बरं का.. यात कमळासारखी खाली चार मुलं बसली आहेत व एक सोडून एक असे चार जण उभे आहेत. या उभ्या असलेल्या मुलांनी बसलेल्यांना हाताने उचलून धरले आहे. एवढंच करून ही मुलं थांबली नाहीत तर जे उभे आहेत त्यांच्या खांद्यावर आणखी चार जण सुद्धा उभे राहिले आहेत. आहे की नाही कमाल?

पहा मंगळागौरी व दहीहंडीचं रिमिक्स

अनाथांच्या आयुष्यात येणार गोडवा.. स्वातंत्र्य दिनाच्या आधी ‘या’ बेकरीने दाखवली भारताची एकता

@shockingClip या पेजवर शेअर केलेला हा व्हिडीओ पाहून आता याला मंगळागौरीला खेळली जाणारी फुगडी म्हणावी की बालगोपाळांची दहीहंडी हे तुम्हीच ठरवा. पण या मुलांच्या टॅलेंटला मात्र १०० पैकी १०० मार्क द्यायला हवेत यात काहीच संशय नाही.