सोशल मीडियावर अनेकजण रात्रीत फेमस होतात. याबाबतची अनेक उदाहरण आपण पाहिली आहेत. मग यामध्ये कोणी सुंदर आवाजात गाणं गायल्यामुळे तर कोणी भन्नाट डान्स केल्यामुळे फेमस होत असतात. पण सध्या एका महिलेने खतरनाक स्टंट करत भन्नाट डान्स केल्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर तुम्हालाही तुमच्या डोळ्यावर विश्वास ठेवणं कठीण होऊ शकतं. खरंतर अनेकजण सोशल मीडियावर जीवघेणे स्टंट करत असतात जे पाहिल्यानंतर नेटकरी त्यांना ट्रोल करतात. पण या महिलेचा व्हिडीओ याला अपवाद आहे. कारण तिने केलेला स्टंट अनेकांना आवडल्याचं पाहायला मिळत आहे.
हो कारण व्हायरल होणाऱ्या या व्हिडीमध्ये महिला एका दाक्षिणात्य चित्रपटाच्या गाण्यावर जबरदस्त स्टंट करताना दिसत आहे. पण हा स्टंट भन्नाट आणि तितकाच थरारक आहे. @karagam_durga नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “थोडासा व्यायाम…” २३ सप्टेंबर रोजी पोस्ट केलेल्या या व्हिडिओलाआतापर्यंत १७ लाखांहून अधिक लोकांनी पाहिलं आहे. व्हिडीओमध्ये, ही महिला घरामध्येच डान्स करता करता स्टंट करताना दिसत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे यावेळी तिने डोक्यावर घरगुती गॅस सिलिंडर डोक्यावर ठेवल्याचं दिसत आहे. शिवाय यावेळी तिने जमिनीवर एक स्टीलचे भांडे देखील ठेवलेले आहे. ती डोक्यावरचा सिलिंडर खाली न पडता भांड्यावर चढून स्टंट करतेय जे पाहून अनेकजण थक्क झाले आहे. शिवाय हा डान्स आहे की स्टंट? असा प्रश्न अनेक नेटकऱ्यांना पडला आहे.




हेही पाहा- गौतमी पाटील नऊवारीत नाही तर सहावारी साडीत थिरकली! व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया –
या महिलेचा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी तिचे कौतुक केले आहे, तसेच तिच्या सुरक्षेबाबत चिंतादेखील व्यक्त केली आहे. कमेंट करताना एका यूजरने लिहिलें, “सुपर आई, पण सावध राहा.” दुसऱ्याने लिहिलं, “हे पाहून मला हार्ट अटॅकच यायचा बाकी होता.” त्याचवेळी आणखी एका यूजरने लिहिलं, “ताई एवढी रिस्क घेऊ नका.”