Mother son Dance Viral Video : सोशल मीडियावर डान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी लहान मुले तर कधी वयोवृद्ध माणसे डान्स करताना दिसतात. तुम्ही आजवर अनेक डान्सचे व्हिडीओ पाहिले असेल पण सध्या माय लेकाचा असा एक डान्सचा व्हिडीओ व्हायरल होत आहे की पाहून तुम्हीही थक्क व्हाल. या व्हायरल व्हिडीओमध्ये मुलगा त्याच्या आईबरोबर सुंदर डान्स करताना दिसत आहे. (dance video a guy dance with his mother amazing dance video viral on social media)

तरुणाने केला आईबरोबर जबरदस्त डान्स!

आई आणि मुलांचे नाते हे जगावेगळे असते. मुलाच्या आनंदासाठी आई वाट्टेल ते करते. या व्हिडीओत तुम्हाला दिसेल की मुलासाठी आई त्याच्याबरोबर डान्स करते. ती मुलाबरोबर सुंदर डान्स करताना दिसते. “मुझे तुम चुपके चुपके जब ऐसे देखती हो” या लोकप्रिय गाण्यावर आई आणि मुलगा डान्स करताना दिसतात. त्या दोघांच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या त्यांचा डान्स व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा : माणुसकीचा अंत! दुचाकीस्वाराच्या चाकाखाली चिरडलं श्वानाचं पिल्लू; धक्कादायक VIDEO पाहून चुकेल काळजाचा ठोका

पाहा व्हायरल व्हिडीओ

namm_belagavi_huduga या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आईबरोबर डान्स”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “आई खूप सुदर डान्स करते” तर एका युजरने लिहिलेय, “सध्या इन्स्टावर असलेल्या इतर आयांपेक्षा ही आई आवडली” आणखी एका युजरने लिहिलेय, “आईसाठी सलाम” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर करत कौतुकाचा वर्षाव केला आहे.

हेही वाचा : VIDEO: लेडीज सीटवरून वाद, महिला आणि पुरुषामध्ये हाणामारी; तुम्हीच सांगा सुसंस्कृत पुण्यातील या प्रकारात चूक कुणाची?

शंकर धवळी असे या तरुणाचे नाव असून तो त्याच्या आई आणि कुटुंबातील इतर सदस्यांबरोबर डान्स करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. त्याच्या प्रत्येक व्हिडीओवर युजर्सनी कमेंट्स आणि लाइकचा वर्षाव करतात.

या पूर्वी असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. तरुण मंडळी कधी त्यांच्या आईबरोबर तर कधी वडिलांबरोबर डान्स करतानाचे व्हिडीओ शेअर करतात तर कधी कोणी त्यांच्या आजी आजोबांबरोबर डान्स करताना दिसतात. हल्ली तरुणांबरोबर ज्येष्ठ मंडळी सुद्धा आवडीने डान्स व्हिडीओ बनवताना दिसतात.