Dance Video: सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सोशल मीडिया हे कला सादर करण्याचं एक माध्यम झालं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तुम्ही डान्सचे अनेक व्हिडीओ पाहिलेच असाल. अगदी लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत अनेकजण आपली कला सादर करत सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत असतात.

सध्या असाच एक डान्सचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे, ज्यात एका महिलेने परदेशी महिलांबरोबर समुद्रकिनारी डान्स केला आहे. अस्सल अस्सल मराठमोळ्या गाण्यावर दोन परदेशी महिला भारतीय महिलेबरोबर डान्स करताना दिसत आहेत.

व्हायरल व्हिडीओ (Dance Viral Video)

सोशल मीडियावर व्हायरल झालेला भारतीय महिलेचा परदेशी महिलांबरोबरचा डान्स पाहून अनेकांनी कौतुक केलं. या व्हायरल व्हिडीओमध्ये गोव्याच्या किनाऱ्यावर या गाण्यावर तिघी थिरकल्या आहेत. भारतीय महिलेचा डान्स पाहून मग तशाच पद्धतीने स्टेप्स करत परदेशी महिलांनी डान्स केला आहे आणि सगळ्यांची मन जिंकून घेतली आहेत.

या डान्ससाठी भारतीय महिलेने निळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली आहे तर दोन्ही परदेशी महिलांनी बिकिनी घातली आहे. या तिघांचाही डान्स पाहून अनेकांनी त्यांचं कौतुक केलं आहे आणि भरभरून कमेंट्स केल्या आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला तरुणीचा हा व्हिडीओ @_namratapatil8080 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसंच व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल ११.९ मिलियन व्ह्युज आले आहेत. तर “परदेशी लोकांसोबत महाराष्ट्रीयन नृत्य” असं कॅप्शन व्हिडीओला देण्यात आलं आहे.

युजर्सच्या प्रतिक्रिया

भारतीय महिलेबरोबर परदेशी महिलांचा डान्स व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “खूप सुंदर दिसतेस तू त्या दोघींपेक्षा” तर दुसऱ्याने “आमची महाराष्ट्राची राणीच भारी दिसते” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “नऊवारी साडी आणि बिकिनीचं फ्यूजन लय भारी” तर एकाने, “ताईचा विषय लय हार्ड आहे. डायरेक्ट फॉरेनरलाच बिकीनीमध्ये नाचवलं.”