Viral video: सोशल मीडियावर रोजच अनेक डान्स व्हिडिओ व्हायरल होत असतात. लहान मुलांपासून अगदी वृद्धांपर्यंत अनेक असे डान्स व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस येत असतात तर कधी अनेक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या संख्येने नेटकऱ्यांच्या कायम आठवणीत राहत असतात. काही लोक इतक्या विचित्र पद्धतीने डान्स करतात की पाहूनच अजब वाटतं. तर काही अशाप्रकारे डान्स करतात की पाहतच राहावंस वाटतं. जे आपण पुन्हा पुन्हा पाहतो. सध्या सोशल मीडियावर मराठमोळ्या महिलेचा डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्या व्हिडिओची सध्या सर्वत्र मोठी चर्चा होत आहे. सोशल मीडियावर सध्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच रील्स बनवत असतात. दरम्यान अशाच हौशी महिलेचा डान्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हल्ली घरातली पुरुष मंडळीच काय, महिलादेखील डान्स करण्यात आघाडीवर असतात. घर सांभाळणारी महिला जेव्हा स्वतःमधलं डान्सचं टॅलेंट दाखवते, तेव्हा ते पाहून अनेकांना तिचं कौतुकही वाटतं. महिलेच्या चेहऱ्यावरचे भाव तुम्हालाही खूप आवडतील. सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे डान्स पाहायला मिळतात पण पारंपारिक डान्सची कुठेही तोड नाही. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. त्यामुळे आपल्या देशात अनेक पारंपारिक नृत्ये प्रसिद्ध आहे. जर महाराष्ट्राचा विचार केला तरी जिल्हा किंवा विभागानुसार वेगवेगळी परंपरा पाहायला मिळते.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, पिरी पिरी नाच पोरी पिरी पिरी नाच या खानदेशी गाण्यावर या महिलेनं डान्स केला आहे. प्रत्येक जिल्हा किंवा विभागातील जेवण, भाषा आणि नृत्यकलामध्ये वेगळेपण दिसून येते. महाराष्ट्रात खानदेश हा एक प्रदेश आहे. येथील खानदेशी जेवण आणि खानदेशी नृत्य विशेष प्रसिद्ध आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेकडे दख्खनच्या पठारावर नि तापी नदीच्या खोऱ्यात वसलेला भूप्रदेश म्हणजे खान्देश. ‘देश तसा वेश’ असे आपण म्हणतो. त्यांची ठसकेबाज अहिराणी भाषा आपल्याला माहितीच आहे तसेच सोबतच खानदेशी गाणीही प्रचंड व्हायरल होतात. अशाच एका खानदेशी गाण्यावर महिलेनं जबरदस्त डान्स केला आहे.

पाहा व्हिडीओ

लग्नसोहळा, एखादा कौटुंबिक कार्यक्रम आणि डान्स हे आता एक समीकरणच बनलं आहे. एखाद्या घरात लग्नकार्य असलं, तर खास डान्स करण्यासाठीही विशेष कार्यक्रम ठेवण्याची पद्धत आता हळूहळू सुरू होतेय. अशा कार्यक्रमांमध्ये घरातली पुरुष मंडळीच काय, महिलादेखील डान्स करण्यात आघाडीवर असतात. अशा कार्यक्रमांमध्ये संपूर्ण घर सांभाळणारी महिला जेव्हा स्वतःमधलं डान्सचं टॅलेंट दाखवते, तेव्हा ते पाहून अनेकांना तिचं कौतुकही वाटतं. अशाच एका काकूंनी हळदीत खतरनाक डान्स केला आहे.