Viral video: लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील तिच्या अदांनी चाहत्यांना नेहमीच घायाळ करत असते. गौतमीच्या कार्यक्रमांनाही चाहते प्रचंड गर्दी करताना दिसतात. गौतमी तिच्या डान्सने चाहत्यांची मनं जिंकून घेते. गौतमी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अनेक ट्रेंडिंग गाण्यावरही ती रील व्हिडीओ बनवते. आता गौतमी पाटीलला टक्कर देत एका तरुणीनं जबरदस्त असा डान्स केला आहे. हा डान्स पाहून सर्वच फिदा झाले आहेत. सोशल मीडियावर तिचा एक नवीन डान्स व्हिडीओ सध्या प्रचंड वेगाने व्हायरल होत असून, चाहत्यांकडून त्यावर कमेंट्स आणि लाईक्सचा अक्षरशः वर्षाव होत आहे.

या तरुणीनं ‘जेव्हा तुझं नी माझं जुळं….’ या मराठी गाण्यावर डान्स केला आहे. विशेष म्हणजे हा डान्स व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, घुंगरांचे बोल…ढोलकीचा ताल…घायाळ अदा आणि लोककलेचा डौलदार लहेजा मिरवत या तरुणीनं सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकुळ घातला आहे. यावेळी ती फक्त लावणी करत नाहीयेत तर तिच्या चेहऱ्यावरच्या आदाही आपल्याला भुरळ घालत आहेत. लावणीच्या बोलाप्रमाणे या तरुणी आपले हावभाव बदलत आहेत. या तरुणीचा डान्स, पेहराव आणि श्रृगांर पाहून तुम्हीही म्हणाल की हे अस्सल मराठी सौंदर्य आहे. लावणी म्हटलं की डोळ्यांसमोर उभं राहतं ते ठसकेबाज नृत्य आणि लावण्यवतीची दिलखेचक अदा. या तरुणीनंही असंच सादरीकरण केलं आहे.

पाहा व्हिडीओ

लावणी म्हणजे महाराष्ट्राची शान…या लावणीच्या माध्यमातून अनेक अदाकारांनी भल्याभल्यांना पायातील घुंगराच्या तालावर नाचवलं आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून लावणी महाराष्ट्रातील लोकांचं मनोरंजन करत आली आहे. अलीकडच्या काळात लावणी देशातच नाही तर परदेशातही पोहोचली आहे. विदेशातील अनेक नृत्यांगणा महाराष्ट्रात येऊन लावणी शिकतात, तिचा अभ्यास करतात. काळानुसार लावणी बदलत गेली. समृद्ध होत गेली. अलीकडच्या काळात तर लावणी थेट डिजेवर सुद्धा वाजत आहे. अशाच एका तरुणीची जबरदस्त लावणी सध्या व्हायरल होत आहे. या तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकुळ घालत आहे,

सोशल मीडियावर हा व्हिडीओ official_sneha1501 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून नेटकरी या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, ताई भारीच, तर आणखी एकानं, “पोरीनं पार घायाळ केलं..किती पाहिले तरी मन भरत नाहीये.” अशी प्रतिक्रिया दिली आहे.