सध्या सोशल मीडियावर लिपसिंक व्हिडीओंसोबतच डान्सचे व्हिडीओही पाहायला मिळत आहेत. ज्यामध्ये एक ६३ वर्षीय आजी आपल्या डान्सिंग स्टेप्सने सर्वांना आश्चर्यचकित करताना दिसत आहे. सोशल मीडियावर या देसी डान्सिंग दादीने आपल्या डान्स स्टेप्सने साऱ्यांनाच वेड लावलंय. या डान्सिंग दादीचा आणखी एक नवा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलाय. या व्हिडीओमध्ये डान्सिंग दादीने अभिनेता वरूण धवनच्या सुपरहिट पंजाबी गाण्यावर अफलातून डान्स केलाय. हा व्हिडीओ पाहून नेटकरी या डान्सिंग दादीला चांगलीच दाद देत आहेत.

आपल्या आवडीनिवडी जपण्यासाठी वयाची मर्यादा नसते. मनात इच्छाशक्ती असेल तर आपण कोणतेही काम करू शकतो. सध्या ही गोष्ट साठी पार केलेल्या या डान्सिंग दादीने सिद्ध करून दाखवलीय. या आजीचे नाव रवि बाला शर्मा असून सोशल मीडियावर त्या डान्स व्हिडीओमुळे चर्चेत आल्या होत्या. आपल्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील जबरदस्त एक्सप्रेशन्सनी डान्सिंग दादीने साऱ्यांनाच घायाळ केलंय. त्या आपल्या सोशल मीडियावर अकाउंटवर नेहमीच वेगवेगळ्या गाण्यावरील डान्स व्हिडीओ शेअर करत असतात. नुकतंच त्यांनी एक नवा व्हिडीओ शेअर केलाय. हा व्हिडीओ नेहमीप्रमाणे नेटकऱ्यांना आवडला असून सोशल मीडियावर तो मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय.

आणखी वाचा : सायकल चालवता चालवता गोरिला धापकन खाली पडला, रागात त्याने काय केलं? पाहा VIRAL VIDEO

या व्हिडीओमध्ये डान्सिंग दादी रवी बाला शर्मा या एक सुंदर सलवार सूटमध्ये दिसत असून सुंदर हेअरस्टाईल केलेली दिसत आहे. या डान्स व्हिडीओमध्ये त्यांच्या शेजारी डान्सर एशिता सिंग ऐथनी देखील दिसत आहे. या व्हायरल व्हिडीओला कॅप्शन असे लिहिले आहे की, “ जेव्हा दोन्ही जणी दिल्लीतल्या आहेत म्हटल्यावर एक पंजाबी गाणं तर वाजायलाच हवं.”

आणखी वाचा : VIRAL VIDEO: डोळ्यांची पापणी लवण्याच्या आत मोबाईल हिसकावला, ट्रेनच्या दरवाज्यावर बसण्याचा शहाणपणा नडला

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : दीक्षांत सोहळ्यात दूरवरून असलेल्या बापाला पाहून लेकाचे अश्रू अनावर, VIRAL VIDEO पाहून भावूक व्हाल

हा डान्स व्हिडीओ तीन दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला होता. हा व्हिडीओ पहिल्यांदा शेअर केल्यापासून त्याला जवळपास पाच हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. लोक या व्हिडीओ कमेंट करत डान्सिंग दादीचं कौतुक करताना दिसत आहेत.