Viral Video : स्त्री ही कुटुंबाचा केंद्रबिदू असते. यामध्ये सासू सुना या कुटुंबातील महत्त्वाच्या व्यक्ती असतात. सासू सुनेचे सहसा पटत नाही, असा सर्वांचा समज आहे पण ही गोष्टी प्रत्येकाच लागू होते असे नाही. काही ठिकाणी सासू सुना गुण्यागोविंदाने राहतात तर काही ठिकाणी सासू सुनांचे पटत नाही. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ‘आम्ही बाई सुना’ या गाण्यावर काही महिला त्यांच्या सासूची तक्रार करत आहे. डान्स करत या सुना सासूची तक्रार करताना दिसतात. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू येईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. (daughter in laws dance on funny song aamhi bai suna)

“राब राब राबतात बिचाऱ्या सुना..”

या व्हायरल व्हिडीओमध्ये चार महिला डान्स करताना दिसतात. ‘आम्ही बाई सुना’ या हास्यजत्रेतील लोकप्रिय गाण्यावर त्या डान्स करत आहे. सुंदर स्टेप्स करत त्या डान्सचा आनंद लुटताना दिसत आहे. तुम्ही हे गाणं ऐकलं का? या गाण्याचे लिरीक्स खूप मजेशीर आहे. “आम्ही बाई सूना, आम्ही बाई सूना, सासू लावी आमच्या संसाराला चुना, राब राब राबतात बिचाऱ्या सुना, राब राब राबतात बिचाऱ्या सुना, इथं तिथं काढे सासूबाई फसकन् फना” या लिरीक्सवर त्या डान्स करताना दिसतात. सोशल मीडियावर ‘आम्ही बाई सुना’या गाण्यावर अनेक रील्स व्हायरल होत आहेत पण हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

video having fun with the kids under the waterfall suddenly the water level rose and the picture changed shocking video goes viral
लोणावळ्याची घटना ताजी असतानाच आणखी एक VIDEO समोर; काही सेंकदांत घेतलेल्या निर्णयामुळे असा बचावला चिमुकला
Bees attacked on women who had gone for vatpaurnima in Nive village of Poladpur taluka
रायगडात वटपूजन करताना अघटित घडले… जाणून घ्या काय आहे प्रकार…
Young girl photoshoot on dam and she fell in dam water shocking video
VIDEO: जीव एवढा स्वस्त असतो का? रीलच्या नादात होत्याचं नव्हतं झालं; पाण्याच्या प्रवाहात तरुणी क्षणात दिसेनाशी झाली
women in Mumbai Bhandup chawl dance so gracefully on marathi song
मुंबईच्या चाळीतील महिलांनी केला तुफान डान्स, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “बाईपण भारी देवा”
If You Dont Believe In Luck And Karma Then Just Watch This Video how man skip death
नशीब आणि कर्मावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; अवघ्या ३ सेंकदात तरुणासोबत नेमकं काय घडलं?
Bird video goes viral
VIDEO: ‘आयुष्यभर कितीही पैसा कमवा शेवटी’ पक्ष्याचा हा व्हिडीओ पाहून कळेल पैसा वास्तव आहे, पण यश नव्हे
a female teacher teach dance to child students on Bumbro Bumbro song
“बुम्बरो बुम्बरो श्याम रंग बुम्बरो” शिक्षिकेने शिकवला चिमुकल्यांना सुंदर डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल
Little Boy injured While Playing On Swing shocking video
VIDEO: झोक्याचा वेग वाढत गेला अन् चिमुकला थेट…एक चूक अशी जीवावर बेतली; पालकांनो मुलांना गार्डनमध्ये एकटं सोडू नका

हेही वाचा : PHOTO: ट्रॅफिकमध्ये विनाकारण हॉर्न वाजवणाऱ्यांना ‘आपला नम्र, एक पुणेकर’ म्हणत जबरदस्त टोला; पुणेरी पाटी पाहून पोट धरुन हसाल

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : VIDEO : पहिला घास नातीला! आजीचं प्रेम पाहून तुम्हीही व्हाल भावूक, आठवतील बालपणीचे दिवस

tsanu_1201’s या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आम्ही बाई सुना” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “सासूबाईंनी रील बघीतली तर तूमच काही खरं नाही” तर एका युजरने लिहिलेय, “तुमच्या आईवर पण काहीतरी म्हणा की गाणं, नवऱ्याच्या आईवर सगळं गाणं काढता” आणखी एका युजरने लिहिलेय, “सासूबाईंनी रील बघितली तर घरी ठेऊन घेणार नाही.” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.