सुशांत, शाहरुखनंतर ‘या’ भारतीय तरुणीने एका खास कारणासाठी चंद्रावर घेतला प्लॉट

मुलीच्या खास गिफ्टनं वडिलांचे डोळे पाणावले

Fathers day ला एका मुलीनं आपल्या वडिलांसाठी चंद्रावर प्लाट खरेदी केल्याचा दावा केला आहे. जर तिचा हा दावा खरा ठरला, तर चंद्रावर जमीन खरेदी करणारी ती तिसरी व्यक्ती असेल. याआधी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि दिवगंत अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांनीही चंद्रावर जमीन खरेदी केली आहे.

उत्तर प्रदेशमधील सहारनपुर येथील पूजा गुप्ता या मुलीनं चंद्रावर एक एकर जमीन खरेदी केली, असून २१ जून रोजी साजरा झालेल्या ‘फादर्स डे’ला वडिलांना (विवेक गुप्ता) भेट म्हणून दिली. आई पिंकी गुप्ता यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, “आतापर्यंत चंद्रावर फक्त तीन जणांनी जमीन खरेदी केली आहे. यामध्ये अभिनेता शाहरुख खान, सुशांत सिंह राजपूत आणि आता सहारनपूर येथील विवेक गुप्ता यांची मुलगी पूजा गुप्ता. पिंकी गुप्ता यांना दोन मुली आहेत. त्या म्हणतात की, “आम्ही मुलींना मुलापेक्षा कधीही कमी समजलं नाही.”

मुलीने ही अनोखी भेट दिल्यानंतर वडिलांची छाती अभिमाने फुलून आली. ही भेट मिळाल्यानं त्यांचे डोळे पाणावले. विवेक गुप्ता म्हणाले की, ‘मुलीने दिलेल्या गिफ्टमुळे आनंद गगणात मावेनासा झालाय. मुलीविषयी मला गर्व आहे. मी माझा आनंद शब्दात व्यक्त करू शकत नाही.’

पूजा गुप्ता यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, ‘मी सहारनपूर येथील राहणारी असून माझं लग्न जांबिया येथे झालेय. मी सध्या USA जाहीराज एजेन्सीमध्ये काम करत आहे. ‘फादर्स डे’ला वडिलांना खास भेट देण्याचा माझा विचार होता. जी त्यांच्या आयुष्यभर लक्षात राहील. त्यातच चंद्रावर जमीन देण्याची कल्पना डोक्यात आली. आंतरराष्ट्रीय लूनर लँड रजिस्ट्री येथून जमीनीची खरेदी केली.’

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Daughter surprises her dad with unique gift buys plot of land on moon for him for fathers day nck

ताज्या बातम्या