Karnataka Cow Slaughter Angry Reactions: कर्नाटकात मुस्लिमांनी गोहत्या केल्याच्या दावा करत एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये जीपच्या वर गाय बांधल्याचे दिसत आहे. कर्नाटकात मुस्लिम समाजाचे लोक खुलेआम गायींची कत्तल करत असल्याचा दावा सुद्धा या पोस्टच्या माध्यमातून करण्यात आला आहे. न्यूजचेकरने यासंदर्भात केलेल्या तपासात या व्हिडीओमध्ये गायीचे शव वनविभागाच्या जीपला बांधले असल्याचे स्पष्ट झाले आहे पण त्याबाबरोबरचा या व्हिडीओमधील आणखी काही तथ्य सुद्धा समोर आली आहेत. नेमकं हे प्रकरण काय हे पाहूया..

काय होत आहे व्हायरल?

१७ सेकंदाच्या व्हिडीओमध्ये एक गाय जीपला बांधलेली दिसत आहे. गर्दीत लोक पोलिसांच्या उपस्थितीत गायीला जीपला बांधतानाही दिसत आहे. १४ मे २०२४ रोजी शेअर केलेल्या X पोस्टमध्ये व्हिडीओ आहे. यात कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, ‘कर्नाटक में मुस्लिम समुदाय द्वारा खुले आम गौ हत्या।’

Man Attacks Two Friends with Knife, knife attack in bhandup, crime in bhandup, crime news, bhandup news, mumbai news,
मुंबई : पोलिसांत तक्रार केल्याच्या रागातून दोघांवर चाकूहल्ला
Panipat murder wife and lover arrested
जिम ट्रेनरशी पत्नीचे सूत जुळले, दोघांनी मिळून पतीला संपवलं; अडीच वर्षांनी पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा
Pakistani Cricketer Post on Vaisho Devi Reasi Attack
Reasi Attack: पाकिस्तानी गोलंदाज हसन अलीची वैष्णोदेवीला जाणाऱ्या भाविकांवरील हल्ल्याविरुद्ध पोस्ट; भारतीयांनी केलं कौतुक
Yuvraj Goyal
भारतीय तरुणाची कॅनडात गोळ्या झाडून हत्या, पोलिसांनी चार संशयितांना घेतलं ताब्यात!
Loksabha Election 2024 Results Five things the Congress Opposition is looking at
दमदार कामगिरीसाठी कोणत्या पाच गोष्टींवर काँग्रेसचे लक्ष?
father arrested for raping two minor daughter in nagpur
संतापजनक! नराधम बापाचा स्वत:च्याच दोन मुलींवर शारीरिक अत्याचार
Fifth accused, Haryana,
सलमान खानच्या हत्येचा कट रचणाऱ्या पाचव्या आरोपीस हरियाणातून अटक
bhusawal bjp former corporator murder marathi news
दुहेरी हत्याकांडाने भुसावळ हादरले; भाजपच्या माजी नगरसेवकासह सामाजिक कार्यकर्त्याची हत्या
https://x.com/Modified_Hindu9/status/1790309724514390391

तपास:

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओचा तपास करण्यासाठी, सर्वप्रथम आम्ही व्हिडिओच्या मुख्य फ्रेम्सवर रिव्हर्स इमेज सर्च केला. यादरम्यान, आम्हाला हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @wayanadview नावाच्या अकाउंटवर आढळला. मल्याळममध्ये लिहिलेल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे, ‘जेव्हा लोकांनी पुलपल्लीमध्ये कायदा स्वतःच्या हातात घेतला’ (अनुवादित).

आता आम्ही ‘वायनाड’, ‘पुलपल्ली’, ‘गोहत्या’ या कीवर्डसह Google वर शोध घेतला. यादरम्यान आम्हाला फ्री प्रेस जर्नलने १७ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रकाशित केलेला रिपोर्ट सापडला. त्यानुसार, ही घटना केरळमधील वायनाड येथे घडली, जिथे वन्य प्राण्यांच्या हल्ल्याच्या निषेधार्थ संतप्त जमावाने गाईचे शव वन विभागाच्या जीपला बांधले होते. वाघाच्या हल्ल्यामुळे या गायीचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.

https://www.freepressjournal.in/india/video-angry-mob-ties-dead-cow-over-forest-department-jeep-in-protest-against-wild-animal-attacks-in-keralas-wayanad

१७ फेब्रुवारी २०२४ रोजी मनोरमाने प्रकाशित केलेल्या रिपोर्टमध्ये पुल्लापल्ली शहरात मानवी व वन्यप्राण्यांमधील संघर्षमय स्थितीच्या निषेधार्थ वाघाने मारलेली गाय वनविभागाच्या जीपला बांधली गेल्याची माहिती स्पष्टपणे नमूद केली आहे.

https://www.onmanorama.com/content/mm/en/kerala/top-news/2024/02/17/human-animal-conflict-wayanad-meeting-forest-minister.html

१८ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रकाशित झालेल्या द न्यू इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, जंगलात झालेल्या हल्ल्यात वन विभागाचे पर्यवेक्षक व्हीपी पॉल यांचा सुद्धा मृत्यू झाला आहे. ज्याच्या निषेधार्थ शेकडो लोक पुलापल्ली शहरातील रस्त्यावर उतरले. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील मानव-वन्यजीव संघर्षावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी केली. वृत्तानुसार, यादरम्यान संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेकही करण्यात आली. मात्र जमावाने वनविभागाची जीप अडवून तिचे नुकसान केले. वाघाने मारलेल्या गायीचा मृतदेह जीपच्या बोनेटवर बांधल्याने तणाव आणखी वाढला होता.

या घटनेवरील इतर प्रकाशित रिपोर्ट देखील येथे वाचता येतील.

https://www.theweek.in/wire-updates/national/2024/02/17/mds19-kl-elephant-attacks-2ndld-hartal.html
https://keralakaumudi.com/en/news/news.php?id=1250884&u=police-lathi-charge-protesting-people-in-pulpally-locals-place-cow-carcass-on-forest-dept-jeep-1250884

निष्कर्ष: तपासातून असे स्पष्ट होते की, व्हायरल दावा खोटा आहे. हा व्हिडिओ वायनाडच्या पुलप्पल्ली येथील मानव-वन्यजीव संघर्षाच्या निषेधाचा आहे.

अनुवाद: अंकिता देशकर

(ही कथा मूळतः न्यूज चेकरने प्रकाशित केली होती आणि शक्ती कलेक्टिव्हचा एक भाग म्हणून लोकसत्ताने पुनर्प्रकाशित केली आहे.)