Viral Video : ९० च्या दशकातील मुले आता तरुण झाली आहे. सोशल मीडियावर ती खूप जास्त सक्रिय असतात. ९० चा काळ खूप महत्त्वाचा होता कारण विज्ञान, तंत्रज्ञान, कला, शिक्षण, क्रिडा प्रत्येक क्षेत्रात बदल होताना या पिढीने पाहिले. त्यामुळे अनेकदा सोशल मीडियावर ते जुन्या गोष्टी शेअर करत बालपणीच्या आठवणीत रमतात. तुम्ही सोशल मीडियावर अनेकदा ९० च्या दशकातील गाणी, चित्रपट, कलाकार, जाहिराती, वस्तू, टिव्हीवरील कार्यक्रमांविषयी अनेकदा ऐकले असेल किंवा पाहिले असेल. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ९० च्या दशकातील जुन्या वस्तू दाखवल्या आहेत. या वस्तू पाहून काही लोकांना त्यांचे बालपण आठवेल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला ९० च्या दशकातील वस्तू दिसेल. तुमच्यापैकी अनेकांनी बालपणी या वस्तूंचा लाभ घेतला असेल. व्हिडीओच्या सुरुवातीला तुम्हाला ब्लॅक अँड व्हाइट टिव्ही दिसेल. त्यावर गाण्याचे कॅसेट लावू शकणारे डेक दिसेल. पुढे तुम्हाला मातीच्या घरात मातीची चूल दिसेल. हे पाहून काही लोकांना गावची आठवण येईल. व्हिडीओत पुढे लहानपणी भातुकलीच्या खेळातील मातीचे भांडी दिसतील. हे भांडी पाहून तुम्हाल बालपणीचे तुमचे मित्र मैत्रीणी आठवतील. त्यानंतर तुम्हाला गुलाबी रंगाचा फोन दिसेल ज्यावर तीन चार गाणी वाजायची. काही लोकांना ती गाणी सुद्धा आठवतील.

Train Accident Viral Video in marathi
ट्रेनच्या दरवाजाला लटकून करत होती व्हिडीओ शूटिंग, अचानक आला विजेचा खांब अन् …;Video मध्ये पुढे जे घडलं ते फार भयंकर
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
Viral video sky hunters fight with water Monster eagles intelligence pales in front of crocodile
VIDEO: “म्हणून कुणालाच कमी समजू नका” मगरीने गरुडाला इंगा दाखवत हरलेला डाव कसा जिंकला एकदा पाहाच
Boy hold funny poster at lalbaug mumbai video goes viral on social Media
“फक्त गर्दीत हात धरणारी नको…” लालबागमध्ये तरुणाची पाटी पाहून सगळ्याच मुली लाजू लागल्या; असं लिहलंय तरी काय? पाहा VIDEO
Man wrote message for his wife in back of the car video goes viral
किती ते प्रेम! नवऱ्यानं बायकोसाठी कारच्या मागे लिहला खास मेसेज; रस्त्यावर सर्व बघतच राहिले, VIDEO पाहून कराल कौतुक
TC Ashish Pande Suspended
Ashish Pande : “मराठी माणसाला एक रुपयाचा बिझनेस देणार नाही”, म्हणणाऱ्या टीसी आशिष पांडेचं रेल्वेने केलं निलंबन
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : पाकिस्तानमध्ये साजरा केला गणेशोत्सव! मराठी कुटुंबाने उत्साह आणि जल्लोषात गायली बाप्पाची आरती, पाहा Video Viral

पुढे व्हिडीओत कुल्फीचा कोन दिसेल. ही कुल्फी पाहून तुम्हाला बालपणीचा उन्हाळा आठवेल. समोर संत्री गोळ्या दिसतात. अशी एकही व्यक्ती नसेल की ज्यांनी लहानपणी संत्री गोळ्या खाल्ल्या नाही. पुढए त्या काळी १ रुपयांची मिळणारी पेप्सी दिसत आहे. नव्वदच्या दशकातील लोकांनी ही पेप्सी एकदा तरी खाल्लीच असेल. त्यानंतर तूप साखरेची पोळी दिसत आहे. लहानपणी आवडीची भाजी नसली की मुले तूप साखरेची पोळी खात असे. त्यानंतर कॅसेट दिसताहेत. या कॅसेट आता हळू हळू कमी झाल्या पण ९० व्या दशकात या कॅसेटमुळे घरोघरी गाणी वाजायची. सर्वात शेवटी कंचे दिसत आहे. हा मुलांचा आवडता खेळ होता. असा एकदी ९० च्या दशकातील मुलगा नसेल ज्याने कंचे खेळले नसतील. शेवटी ९० च्या काळातला कंदील भिंतीला लटकवलेला दिसत आहे. या व्हिडीओवर लिहिलेय, “मी याच पिढीतील आहे”

blue.rain_1212 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “बालपणीचे दिवस” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “आम्ही खूप भाग्यवान आहोत की आम्ही या पिढीचे आहोत” तर एक युजर लिहितो, “मी माझ्या बालपणीच्या दिवसांची खूप आठवण येते.” आणखी एका युजरने लिहिलेय, “मी पण हे आयुष्य जगलो, अगदी मनसोक्तपणे” अनेक युजर्सना हा व्हिडीओ पाहून त्यांचे बालपण आठवले.