Crocodile Attacked by Lionesses: प्राण्यांशी संबंधित अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमी व्हायरल होत असतात. जंगलात कोणीही सुरक्षित नसतं. जंगलात प्रत्येक प्राण्याला त्याची स्वत:ची सुरक्षा करण्यासाठी खूप सावधान राहावं लागतं. जंगलात प्राण्यांना जगण्यासाठी दररोज संघर्ष करावा लागतो. सामान्यतः वाघ, सिंह आणि बिबट्या हे जंगलात अतिशय धोकादायक शिकारी प्राणी मानले जातात. कितीही मोठा प्राणी असूदेत, तो या प्राण्यांना बघून पळून जातो. काही वन्य प्राणी असे असतात की ते जंगलात असो किंवा दुसरीकडे कुठे, त्यांची भीती कायम असते. सोशल मीडियावर प्राण्यांशी संबंधित अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. हे व्हिडीओ कधी थरारक असतात, तर कधी मजेदार असतात. त्यामध्ये आणखी एका व्हिडीओची भर पडली आहे.
सध्या सोशल मीडियावर एक अंगावर काटा आणणारा व्हिडीओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक मगर तलावाबाहेर थोडा आराम करण्यासाठी जमिनीवर येते आणि क्षणाचाही विलंब न करता तीन सिंहिणी तिच्यावर हल्ला चढवतात. जंगलातील जीवन आणि शिकार कशी केली जाते, याचे अत्यंत जिवंत चित्रण या दृश्यातून पाहायला मिळते.
या थरारक व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसते की, मगर पाण्याच्या किनाऱ्यावर येते. कदाचित ती थोडा वेळ उन्हात पडून विश्रांती घेण्याच्या उद्देशाने बाहेर पडते. पण, मगरीला याची कल्पनाही नसते की झाडीत आधीपासूनच तीन सिंहिणी दबा धरून बसल्या आहेत. पाय जमिनीवर पडतात न पडतात तोच सिंहिणी तिच्यावर तुटून पडतात.
पण मगरही लगेच हार मानत नाही. आपल्या जीवनासाठी ती शेवटपर्यंत झुंज देते. एक सिंहीण झपाट्याने तिच्यावर झेप घेते, पण मगर पलटवार करते. तिच्या धारदार जबड्यांनी आणि ताकदीने ती बचाव करण्याचा प्रयत्न करते. मात्र, दुसरी व तिसरी सिंहीणदेखील लगेच पुढे सरसावतात. जीव वाचवण्यासाठी धडपडणारी मगर आणि शिकारींची एकजूट. ती कधी अंगावर लोळते, कधी तोंड उघडून सिंहिणींना घाबरवण्याचा प्रयत्न करते, पण त्या तिन सिंहिणींच ताकद तिच्यावर मात करत असल्याचं दिसतं.
हा व्हिडीओ जंगलातील वास्तव, तिथली अनिश्चितता आणि जीवन-मृत्यूचा सतत चालणारा संघर्ष दाखवतो. जंगलात केवळ ताकद असून भागत नाही, तर योग्य वेळी निर्णय घेण्याची समज आणि चतुराईही तितकीच आवश्यक असते. यावेळी मात्र मगरीने किनाऱ्याचा अंदाज घेण्यात चूक केली, तर सिंहिणींनी आपली एकजूट आणि नेमकी रणनीती वापरून तिला पूर्णपणे कोंडीत पकडलं.
येथे पाहा व्हिडीओ
हा रोमांचक व्हिडीओ wildlife_bigcats नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर अपलोड करण्यात आला असून, पाहणाऱ्यांच्या अंगावर काटा आणणारा आहे. सोशल मीडियावर अनेक नेटकऱ्यांनी आपआपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.