viral : प्रजासत्ताक दिनाच्या संचलन सोहळ्यात संरक्षणमंत्री पर्रिकरांना झोप अनावर

डुलकी घेत असतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल

संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांचे प्रजासत्ताक दिनाच्या संचलन कार्यक्रमान डुलकी घेतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

राजधानी दिल्लीत राजपथाववर ६८ व्या प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार संचलन सोहळा पार पडला. यावेळी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी अमर जवान ज्योतीजवळ येत शहीदांना श्रद्धांजली दिली पण यापेक्षाही आजच्या दिवसात पर्रिकर एक वेगळ्याच कारणाने सोशल मीडियावर चर्चेत आले. त्याचे झाले असे की राजपथावर कार्यक्रम सुरु असताना पर्रिकररांचा डुलक्या घेतानाचा फोटो कॅमेरात कैद झाला असून तो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वाचा : प्रजासत्ताक दिन सोहळ्याच्या प्रमुख पाहुण्यांच्या नावावर जगातील महागड्या लग्नसोहळ्याचा विक्रम

Republic Day 2017 : ‘येथे’ पार पडले होते ‘प्रजासत्ताक दिना’चे पहिले संचलन

VIDEO : १८ सिंहांच्या ‘शाही भोजना’ने रस्त्यात झाली वाहतूक कोंडी

संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांचे प्रजासत्ताक दिनाच्या संचलन कार्यक्रमात डुलकी घेतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण त्याचबरोबर त्यांच्यावर अनेक टीकाही होत आहे. याआधीही स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात पर्रिकरांचा डुलकी घेताना फोटो व्हायरल झाला होता. आता डुलकी घेणारे  पर्रिकर काही पहिलेच नाही. १५ ऑगस्ट २०१६ ला मोदींच्या भाषणाच्या वेळी अनेक नेते डुलकी घेताना कॅमेरात कैद झाले होते. याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना देखील डुलकी घेताना कॅमेरात टिपले होते. इतकेच नाही तर मोदींचे भाषण खूप रटाळ होते अशी ओळ लिहित मनिष सिसोदिया यांनी नेत्यांचे डुलकी घेतानाचे फोटो शेअर केले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Defence minister manohar parrikar napping during republic day parade picture has gone viral

ताज्या बातम्या