Premium

‘२००० नोट द्या आणि ३००० रुपयांचे जेवण खा’; ‘या शहरात रेस्टॉरंट मालकाने सुरू केली खास स्कीम

तुमच्याकडेही २००० ची नोट असेल आणि तुम्हाला खाण्यासाठी खर्च करण्याची इच्छा असेल तर या रेस्टॉरंटची स्कीम तुमच्यासाठी बेस्ट आहे. सध्या ही स्कीम सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

delhi restaurant scheme for 2000 note
२००० च्या नोटेबाबत दिल्लीमधील रेस्टॉरंटची अनोखी स्कीम (फोटो – Freepik)

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अलीकडेच २००० च्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली. या घोषणेनंतर लोकांनी आपल्याकडे ठेवलेल्या २००० रुपयांच्या नोटा बँकेत जमा करण्यास सुरुवात केली आहे. यानंतर बहुतांश लोक विशेषत: दुकानदार २००० च्या नोटा घेण्यास नकार देत आहे. यामुळे तुमच्याकडेही २००० नोटा असतील आणि तुम्हाला त्या बदलण्याची काळजी वाटत असेल आणि तुम्हाला बँकेत रांगेत उभे राहण्यासाठी वेळ नसेल तर आम्ही तु्म्हाला अशा एका रेस्टॉरंटबद्दल सांगणार आहोत, जिथे २००० च्या नोटांसाठी एक खास स्कीम सुरू केली आहे. या रेस्टॉरंटमध्ये तुम्ही २००० ची नोट दिल्यानंतर तुम्हाला ३००० रुपयांचे जेवण खाता येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अडोर २.१ रेस्टॉरंटची स्कीम काय आहे?

नवी दिल्लीतील प्रसिद्ध कॅनॉट प्लेसमध्ये असलेल्या अडोर २.१ नावाच्या रेस्टॉरंटने ‘अब दुविधा में भी सुविधा है’ नावाची एक स्कीम सुरू केली आहे. या स्कीममुळे तुम्हाला २००० ची नोट बदलण्यासाठी बँकेत रांगेत उभे राहण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त या रेस्टॉरंटमध्ये यायचे आहे, २००० रुपयांची नोट देऊन, त्याऐवजी ३००० रुपयांपर्यंतचे खाद्यपदार्थ मागवायचे आहेत. म्हणजेच तुमची २००० रुपयांची नोटही वापरली जाईल आणि तुम्हाला १००० रुपयांचे खाद्यपदार्थ फ्रीमध्येही मिळतील. ही स्कीम ३१ जुलैपर्यंत चालणार आहे. पण ज्यांना २००० च्या नोटा बदलून पाहिजे असतील तर त्यांच्यासाठी ही स्कीम काहीच कामाची नाही.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Delhi ardor 2 1 restaurant scheme 2000 note changing with lots of benefits sjr

First published on: 31-05-2023 at 13:32 IST
Next Story
Bye शब्दाचा अर्थ माहितीये का? कुणालाही बाय बोलण्याआधी फुल फॉर्म जाणून घ्या