दिल्लीच्या मुखर्जी नगरमध्ये बुधवारी संध्याकाळी चार मजली पेइंग गेस्ट (पीजी) सुविधा असलेल्या बिल्डिंगमध्ये आग लागल्याची घटना घडली. या इमारतीमध्ये एका चिमुकल्याबाळासह ७ जण अडकले होते. दिल्ली पोलिसमधील एका अधिकाऱ्यानेने २ वर्षाच्या चिमुकल्या बाळासह सर्वांना वाचवण्याचे काम केले आहबे. या इमारतीत सुमारे ३५ मुली राहात होत्या, ज्या जवळच्या परिसरातच प्रशिक्षण घेत होत्या.

आग लागल्यानंतर काही मुली सुरुवातीला पळून बाहेर पडण्यात यशस्वी झाल्या, तर एका मजल्यावर सात जण अडकले होते, ज्यात अंबी या नावाच्या २ वर्षाच्या मुलीचाही समावेश होता. दरम्यान शेजाऱ्यांनी तातडीने वीज पुरुवठा खंडित करून अग्निशमन दलाला माहिती दिली.

Elderly woman commits suicide in Mulund
मुंबई : मुलुंडमध्ये वृद्ध महिलेची आत्महत्या
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
A case has been registered against the three who assaulted the policeman on patrol Mumbai news
गस्तीवरील पोलिसाला मारहाण; तिघांविरोधात गुन्हा दाखल
pune satara highway accident marathi news
मुंबई: मुलुंडमध्ये हिट अँड रन, एकाचा मृत्यू
Vasind police station, three employees Suspension,
वासिंद पोलीस ठाण्यातील तीन कर्मचाऱ्याचे निलंबन, तरुणाच्या मृत्यूनंतर ठाणे ग्रामीण पोलिसांची कारवाई
protest against netyanahu in israel
ओलिसांच्या हत्येमुळे इस्रायलमध्ये आंदोलन पेटले; कारण काय? मारले गेलेले सहा ओलिस कोण होते? त्यांची हत्या का करण्यात आली?
Dombivli West, illegal building, land mafias, demolition notice, municipality, Prakash Gothe, Shankar Thakur, encroachment control,
जुनी डोंबिवलीत पायवाट बंद करून उभारलेल्या बेकायदा इमारतीला नोटीस, इमारतीत प्रवेशासाठी रस्ता नसल्याने गाळ्यामधून प्रवेशव्दार
passenger gold Jewellery worth rs 2 75 lakh stolen in bus traveling in a konduskar travels from kalyan
कल्याण-कोल्हापूर कोंडुस्कर ट्रॅव्हल्सच्या बसमध्ये प्रवाशाचा ऐवज चोरीला

दिल्ली अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि बाथरूममधील खिडकी तोडली, ज्यामुळे ताजी हवा येऊ शकेल. दरम्यान, अडकलेल्या मुलींनी आगीच्या ज्वाळांपासून बचाव करण्यासाठी स्वतःला पाण्याने ओले केले होते.

हेही वाचा – ”ताई, तुला मानाचा मुजरा”, एका हातानेच ढोल वादन करणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ व्हायरल, लोकांनी तिच्या जिद्दीचे केले कौतूक

दरम्यान, पीजी इमारतीला जोडलेल्या शेजारच्या घरात प्रवेश केला, एक भिंत तोडली आणि आगीवर नियंत्रण मिळवले. त्यानंतर धुरामुळे अर्धवट बेशुद्ध अवस्थेत असलेल्या अंबीसह सर्व मुलींना त्यांनी यशस्वीरित्या बाहेर काढले.

यानंतर अजमेर सिंग या पोलीस अधिकाऱ्याने अंबीला तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेले. अजमेरने असेही स्पष्ट केले की, ”जेव्हा अंबी प्रतिसाद देत नव्हती तेव्हा मी खूप घाबरलो बोको. मात्र जेव्हा तिच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आणि ती रडली तेव्हा मी खूप भावुक झालो. त्या मुलीचा पुनर्जन्म झाल्यासारखे वाटले,”

हेही वाचा – ”लग्नासाठी मुलगी पाहिजे पण आई…” ढोलवादकाने हटके स्टाइलमध्ये घातली लग्नाची मागणी, अट एकच; VIDEO तुफान व्हायरल

अंबीच्या आईने खुलासा केला की, ”ती बाजारात गेली असताना तिला पीजीमध्ये तिच्या मावशीकडे सोडले होते. आगीची माहिती मिळताच, तिने घटनास्थळी धाव घेतली आणि आपल्या बाळाचे प्राण वाचवल्याबद्दल अजमेरचे आभार मानले आणि त्याला ” साक्षात देवाचा अवतार” आहे असे म्हटले.