दिल्ली सरकारने बऱ्याच मोठ्या गॅपनंतर बंद शाळा सुरू करण्यासाठी परवानगी दिली होती. मात्र, दिल्लीतल्या वाढत्या प्रदूषणामुळे शाळा पुन्हा एकदा बंद करण्यात आल्या. त्यानंतर आता पुन्हा शाळा सुरू झाल्यानंतर दिल्लीतल्या पालकांसह मुलांमध्ये सुद्धा आनंदाचं वातावरण दिसून येतंय. बऱ्याच दिवसांनी मुलांना शाळेत पाठवता येणार असल्याने पालकांना खूप आनंद झाला. दिल्लीतलं एक कुटूंब तर चक्क ढोल ताशांच्या गजरात आपल्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी आले होते. याचाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की बँड-बाजासह एक कुटुंब शाळेबाहेर आपल्या मुलासोबत उभे आहे. आजूबाजूचे लोक आणि लहान मुले सुद्धा या ढोल ताशांच्या गजरात नाचताना दिसून येत आहेत. हा व्हिडीओ दिल्लीतल्या धौला कुआनजवळील स्प्रिंगडेल्स शाळेचा आहे. अनेक पालक आपल्या मुलांना शाळेत सोडण्यासाठी आले होते.

AbhishekSaket नावाच्या एका युजरने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. “दिल्लीकरांना कोणीही हरवू शकत नाही. त्यांना फक्त उत्सवासाठी निमित्त हवं असतं. लॉकडाउननंतर जेव्हा त्यांच्या मुलांची प्रत्यक्षात शाळा सुरू झाली तेव्हा कुटुंबाने बँड-बाजा सोबत आनंद साजरा केला…,” अशी कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावरील वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर अगदी वाऱ्यासारखा पसरू लागला.

आणखी वाचा : जेव्हा चिमुकलीने पहिल्यांदा कर्ण बधिर वडिलांसोबत संवाद साधला…; हा VIRAL VIDEO पाहून तुम्हीही भावुक व्हाल

आणखी वाचा : Thane Temple Theft: आधी देवाच्या पाया पडला आणि मग पळवली दान पेटी; हनुमानभक्त चोराचा VIDEO VIRAL

पुन्हा एकदा शाळा सुरू होणार असल्याचा आनंद या व्हिडीओमधील मुलांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे झळकत होता. या व्हिडीओवर नेटिझन्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. आतापर्यंत या व्हिडीओला १ लाख ३५ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

नेटिझन्सना हा व्हायरल व्हिडीओ खूपच आवडलाय. बॅंड-बाजाच्या दणदणाटात मुलांना शाळेत सोडवण्याची ही संकल्पना नेटकऱ्यांना खूपच आवडली आहे. या व्हिडीओचा लोक मनमुराद आनंद लुटताना दिसून येत आहेत. या व्हिडीओवर नेटिझन्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत. एका युजरने लिहिले, “पालकांना आता किती आराम मिळेल याची कल्पना करा.. “ दुसऱ्या युजरने लिहिलं, “मुलांना शाळेत पाठवता येणार असल्याने आता पालकांना संपूर्ण दिवस घरी त्यांची काळजी घेण्याची गरज नाही,”.

काही दिवसांपूर्वीच शाळा उघडण्यास परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर दिल्ली सरकारने आठवडाभर शाळा बंद केल्या होत्या. मात्र, ऑनलाइन क्लासेस पूर्वीप्रमाणेच सुरू होते. दिल्लीत वाढत्या प्रदूषणामुळे मुलांचे आरोग्य बिघडण्याची शक्यता होती. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला होता. त्याचबरोबर दिल्लीत इतरही अनेक गोष्टींवर बंदी घालण्यात आली आहे.