रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांना खाऊ घालणाऱ्या एका तरुणीवर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राजधानी दिल्लीतील रघुबीर नगर भागात १४ मे (सोमवार) रोजी दुकानात काम करणाऱ्या एका व्यक्तीने हा अमानुष हल्ला केला. तरुणीने हल्ल्यानंतर रक्तबंबाळ झालेल्या अवस्थेत स्वत: व्हिडीओ शेअर करत या घटनेची माहिती दिली आहे. दररोज प्रमाणे ती १४ मे रोजी कुत्र्यांना खाणं देण्यासाठी निघाली तेव्हा ही घटना घडली.

हल्लेखोराने केवळ तरुणीवरच हल्ला केला नाही तर अन्न खाणाऱ्या कुत्र्यांवरही हल्ला केला, तसेच हे थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्राणीप्रेमीलाही शिवीगाळ करत त्रास दिला. तिने इन्स्टाग्रामवर एक एक करून या संपूर्ण घटनेचे अतिशय धक्कादायक असे व्हिडीओ शेअर केले आहेत. यात हल्लेखोराने केलेल्या क्रूर हल्ल्यानंतर तिच्या डोक्यातून रक्तस्त्राव होत असल्याचे दिसून येत आहे.

Live Accident Speeding bike hit bridge and fell down
VIDEO: मृत्यूचं वळण! मध्यरात्रीच्या वेगानं क्षणात होत्याचं नव्हतं झालं; गाडी पुलावर अन् प्रवासी खाली कोसळले
Cheetah attack deer viral video
VIDEO: ‘शिकार करो या शिकार बनो’ चित्ता आणि हरणामध्ये झटापट; हरणाच्या ‘त्या’ झेपेची सोशल मीडियावर चर्चा
What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
Young woman's obscene dance on Marine Drive
निर्लज्जपणाचा कळस! रिल्ससाठी मरिन ड्राइव्हवर तरुणीचा अश्लील डान्स; Viral Video पाहून नेटकरी म्हणाले, “आता मुंबईतही घाण..”
funny viral video careless girl falls on train track scotty railway crossing
ट्रेन येणार म्हणून घाईघाईत ओलांडू लागली रेल्वे फाटक तितक्यात…; VIDEO तील तरुणीचे कृत्य पाहून तुम्ही पोट धरून हसाल
puneri pati viral there is no love like father Emotional Slogan Written Behind puneri riksha Video
“आज पाहिलेली सगळ्यात भारी पुणेरी पाटी” रिक्षामागची पाटी पाहून व्हाल भावूक; पुण्यातला VIDEO व्हायरल
In Viral Video bus driver Catching A Thief In Filmy Style
बस चालकाची हुशारी; सोनसाखळी चोराला असा पकडला, VIDEO पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
Viral Video Girls Fall Down badly on scooty
आधी स्टाईल मारली मग स्कूटीवरुन धपकन पडल्या तरुणी; ‘हा’ VIDEO पाहून पोट धरुन हसाल

भटक्या कुत्र्यांना खाऊ घालणाऱ्या तरुणीवर जीवघेणा हल्ला

मनीषा सोलंकी असे त्या तरुणीचे नाव आहे. ती परिसरातील रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांना नियमितपणे खायला घालत असे. ती आणि तिची आई दोघी रोज घरात अन्न तयार करून परिसरातील कुत्र्यांना खायला घालतात. एक दिवस त्या अशाच नेहमीप्रमाणे कुत्र्यांना खायला घेऊन गेल्या, मात्र यावेळी ही दुर्दैवी घटना घडली. कुत्र्यांना ज्या ठिकाणी या रोज खायला द्यायच्या, त्याच्या अगदी शेजारी असलेल्या दुकानात काम करणाऱ्या एका व्यक्तीने मनीषा आणि कुत्र्यांवर निर्दयीपणे हल्ला केला.

सोनू (एफआयआरनुसार) नावाची ही व्यक्ती काठी घेऊन कुत्र्यांच्या दिशेने गेली आणि त्यांना निर्दयीपणे मारू लागली. यावेळी कुत्रे कोणताही त्रास देत नसतानाही तो मारत राहिला, यामुळे ते वेदनांनी जोरजोरात ओरडत होते.

कुत्र्यांना निर्दयीपणे मारहाण

यावेळी मनीषाने त्या व्यक्तीला रोखण्याचा प्रयत्न केला. “काका तुम्ही काय करताय? ते खाऊन निघून जातील. तुम्ही त्यांना का मारताय? ते खाण्यासाठी इथे आले आहेत, त्यांना का मारता?” असे म्हणत मनीषाने हल्लेखोराला रोखण्याचा पूर्ण प्रयत्न केला, पण तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. ज्या काठीने ती व्यक्ती कुत्र्यांना मारत होती त्या काठीला टोकदार खिळे होते, ज्यामुळे एका कुत्र्याला गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ मनीषाने स्वत: पोस्ट केला आहे.

रक्तबंबाळ अवस्थेत मनीषाने रडत व्हिडीओ केला रेकॉर्ड

पीडित तरुणीने इन्स्टाग्रामवर संपूर्ण घटनेची माहिती दिल्यानंतर, तिने मुक्या प्राण्यांवरील हिंसाचाराच्या घटनेच्या काही रील शेअर केल्या आहेत. भटक्या कुत्र्यांना काठ्यांनी मारहाण करणाऱ्या व्यक्तीला तरुणीने थांबवण्याचा प्रयत्न केला, पण यावेळी व्यक्तीने तिच्यावरही हल्ला केले , असे तिने निदर्शनास आणून दिले.

निर्लज्जपणाचा कळस! बसच्या मागच्या सीटवर कपलचे अश्लील चाळे; प्रवाशांसमोर केले असे काही घाणेरडे कृत्य की….; VIDEO झाला व्हायरल

एका व्हिडीओत मनीषाने दिल्लीच्या रस्त्यांवर रक्तबंबाळ अवस्थेत चालताना रडत एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात ती रडत सांगतेय की, आम्हाला खूप मारहाण करण्यात आली. आम्हाला कोणीही मदत केली नाही. आम्हाला पाठिंबा देण्यासाठी कोणीही उभे राहिले नाही,” या घटनेत जखमी झाल्यानंतर तिला वैद्यकीय सुविधा देण्यात आली.

तरुणाचा रक्तबंबाळ अवस्थेतील व्हिडीओ

आरोपीविरोधात एफआयआर दाखल

या घटनेनंतर पीडित तरुणी आणि तिच्या आईने स्थानिक पोलिस ठाण्यामध्ये जाऊन तक्रार दाखल केली. या संदर्भात एफआयआर नोंदवून आरोपी सोनूवर कुत्र्यांना काठीने मारहाण केल्याप्रकरणी, त्यांना खायला घालणाऱ्या व्यक्तींवर हल्ला केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. ही घटना १४ मे रोजी घडल्याचे कागदपत्रात नमूद करण्यात आले आहे.

ही घटना आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यावर अनेक प्राणीप्रेमींनी पीडित तरुणीवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत आरोपीवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.