गेले काही दिवस मेट्रो ट्रेन कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत आहे. आतापर्यंत मेट्रोतील बरेच वादग्रस्त व्हिडीओ समोर आले आहेत. कधी कुणी महिला अश्लील कपडे घालून आली तर कधी प्रेमाच्या नावाने कपलचा मेट्रोत नको तो रोमान्स पाहायला मिळाला. यामध्ये मजेशीर, विचित्र, भयानक, डान्स, भांडण सर्वच प्रकारचे व्हिडीओ समोर येतात. आता पुन्हा आणखी एक असाच व्हिडीओ व्हायरल होत आहे. दरम्यान मागे व्हायरल झालेल्या बिकनी गर्लनंतर आता क्रॉप टॉप घालून दिल्ली मेट्रोत डान्स करणाऱ्या मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हा व्हिडीओ तुम्ही पाहू शकता, हा मेट्रोतला व्हिडीओ असून मेट्रोमध्ये भर गर्दीत एक तरुणी क्रॉप टॉप घालून उभी आहे. दरम्यान सुरुवातीला उभी असलेली ही तरुणी अचानक डान्स करु लागते. मेट्रोतून प्रवास करणारी ही तरुणी. जिच्या आजूबाजूला सर्व पुरुष प्रवाशीच दिसत आहेत. त्यांच्या मध्ये राहून ही तरुणी अश्लील डान्स करत आहे. आजुबाजूचे लोकही तिला बघून शॉक झाले आहेत. सर्वच तिच्याकडे आश्चर्यकारक नजरेने पाहत आहेत. तिच्या मागे असलेल्या व्यक्तीला मात्र तरुणीचं असं कृत्य पाहून मोठा झटका बसल्याचं दिसतं आहे. हा व्हि़डीओ सोशल मीडीयावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी बिकनी गर्लशी या तरुणीची तुलना केली आहे.




पाहा व्हिडीओ
हेही वाचा – कृतज्ञ हत्ती! जीव वाचवल्यानंतर हत्तीनं मानले जेसीबीवाल्याचे आभार, पाहा व्हायरल Video
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, नेटकरी संमिश्र प्रतिक्रिया यावर देत आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून दिल्ली मेट्रोमधील बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अशा अनेक वेगवेगळ्या घटना मेट्रोमध्ये समोर येतात. लोकांनी व्हिडीओ काढून सोशल मीडियावर टाकताच काही वेळातच असे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात.