देशाची राजधानी दिल्ली मेट्रोमध्ये रेल्वे सेवा लाईफलाईन आहे पण या लाइफलाईन संबधित अनेक व्हायरल फोटो – व्हिडिओ सतत पाहायला मिळत असतात. रोज दिल्ली मेट्रोमधून कोणता कोणता व्हिडिओ व्हायरल होत असतो. विचित्र कपडे परिधान करण्यापासून अश्लील चाळे करतानाचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता आणखी एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये चक्क दोन तरुणींची मारमारी दिसत आहे.
दिल्ली मेट्रोत तरुणींची मारामारी




दिल्ली मेट्रोमध्ये महिलांच्या कोचमधील व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दोन मुलीं भांडताना दिसत आहे. एक मुलीच्या हातात चप्पल दिसत आहे तर दुसरीच्या हातात पाण्याची बाटली. सुरुवातीला मारण्यासाठी दोघी एकमेकींना आव्हान देताना दिसत आहे. मग एकमेकींपासून दूर जाते. या दरम्यान, एक मुलगी दुसरीला शिवी देते तेव्हा तिच्यावर पाणी फेकते.
हेही वाचा – टॉयलेटमध्ये ६ तास घालवणाऱ्या कर्मचाऱ्याला कंपनीने टाकले काढून, कोर्टात झाली पोलखोल, कारण ऐकून व्हाल थक्क!
तुफान व्हायरल होतोय व्हिडिओ
दिल्ली मेट्रोसंबधिक व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात. गेल्या काहा दिवसांमध्ये मुली बिकनी परिधान करुन मेट्रोमध्ये प्रवास करताना दिसत होत्या तेव्हा कोणीतरी त्यांचा व्हिडिओ व्हायरल केला. याशिवाय मेट्रोमध्ये अश्लील व्हिडिओ देखील व्हायरल झाले आहे ज्यावर लोकांकडून सतत प्रतिक्रिया येत आहे. ताजा व्हिडिओ पाहून लोक ट्विटरवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहे. एकाने म्हटले आहे की दिल्ली हे आता युद्धाचे रणांगण झाले आहे.