scorecardresearch

Premium

Video : दिल्ली पोलिस अधिकाऱ्याने फिल्मी स्टाईलमध्ये सोनसाखळी चोरांना घेतलं ताब्यात

दिल्लीचे अधिकारी एएसआई अजय यांनी फिल्मी स्टाईलमध्ये चोरांना पकडलं आहे.

Delhi Police officer arrests gold chain thieves in film style
(सौजन्य:ट्विटर/@delhipolice) दिल्ली पोलिस अधिकाऱ्याने फिल्मी स्टाईलमध्ये सोनसाखळी चोरांना घेतलं ताब्यात

चोरांसाठी चेन स्नॅचिंग हा पैसे मिळवण्याचा एक सहज मार्ग आहे. आतापर्यंत सोनसाखळी चोरांचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. चोरटे महिलांना ईजा पोहचवून त्यांच्या गळ्यातील चैन खेचून निघून जातात. तर पोलिसांना अशा चोरांवर चोवीस तास लक्ष ठेवावं लागतं. दिल्लीच्या मॉडेल टाऊन बाजारातसुद्धा अशीच एक घटना घडली आहे. बाजारात महिलेची चेन घेऊन दोन चोर दुचाकीवरून पळ काढत होते. पण, वेळीच हजर राहणारे दिल्लीचे अधिकारी एएसआई अजय यांनी फिल्मी स्टाईलमध्ये चोरांना पकडलं आहे.

बाजारात दुचाकीवरून जाणारे दोन चोर एका महिलेसोबत चेन स्नॅचिंग करत होते. बाजारात कामानिमित्त दिल्ली पोलिसांचे एएसआईदेखील उपस्थित होते. चेन स्नॅचिंगची घटना पाहताच त्यांनी चोरांना पकडण्यासाठी धाव घेतली आणि गुन्हेगारांच्या दुचाकीला लाथ मारून रोखले. पोलिस कर्मचारी आणि इतर लोकांनी मिळून चोरट्यांना पकडले आणि त्यामुळे चोरट्यांचा चेन स्नॅचिंगचा प्लॅन पूर्णपणे फसला. हे पूर्ण प्रकरण सीसीटीव्हीमध्ये कैद झालं आहे. योग्य वेळी चोरांना पकडणाऱ्या एएसआई अजय यांचा व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा बघाच…

Mumbai Police has given a message to the bike riders with the help of a song
फरक ओळखा, हेल्मेट घाला! मुंबई पोलिसांचा संदेश देणारा Video….
Woman Doing Split On Two Cars
रिलसाठी कायपण! अजय देवगण स्टाइलमध्ये तरुणीने केले स्टंट! नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, म्हणाले, ”हा तर मुर्खपणा”
Pre-wedding shoot of police officers in Hyderabad went viral IPS officers gave valuable advice after watching the video
हैदराबाद पोलिस अधिकाऱ्यांच्या प्री-वेडिंग शूटची चर्चा… Video पाहून आयपीएस अधिकाऱ्यांनी दिला मोलाचा सल्ला
A young man's stunts in a running train Thrilling video from Mumbai local is going viral
जीवघेणा खेळ! धावत्या ट्रेनमध्ये तरुणाची स्टंटबाजी; मुंबई लोकलमधील थरारक व्हिडीओ होतोय व्हायरल

हेही वाचा… गुगलची पंचविशी! जगप्रसिद्ध सर्च इंजिनचा २५ वा वाढदिवस

व्हिडीओ नक्की बघा :

एएसआईने (ASI) शिकवला चोरांना धडा :

२४ सप्टेंबरला अधिकारी संध्याकाळी ५:१० मिनिटांच्या सुमारास एएसआई (Assistant Sub-Inspector) अजय झा मॉडेल टाऊन मार्केटमध्ये गेले होते. यादरम्यान परिसरातून त्यांना रस्त्यावर ‘चोर-चोर’ असा आवाज ऐकू आला. दोन सोनसाखळी चोर दुचाकीवरून पळ काढून जात होते. एएसआई अजय हे पाहून धावत रत्यावर गेले आणि दुचाकीवरून जाणाऱ्या चोरांच्या गाडीला लाथ मारली. असे करताच दोन्ही चोर दुचाकीवरून जमिनीवर खाली पडले आणि परिसरात जमलेल्या लोकांनी त्यांना ताब्यात घेतले.

दिल्ली पोलिसांनी हा व्हिडीओ त्यांच्या एक्स (ट्विटर) @DelhiPolice अकाउंटवरून शेअर केला आहे. दिल्ली पोलिस कम्युनिकेशनमध्ये तैनात ASI अजय झा यांनी हिम्मत दाखवून मॉडेल टाऊन मार्केटमध्ये स्कूटरवरून पळून जाणाऱ्या चोरट्यांना लाथ मारून रोखले आणि चेन स्नॅचिंगचा प्रयत्न उधळून लावला. #दिल्ली पोलिस यांना तुमचा अभिमान आहे, असे खास कॅप्शन या व्हिडीओला देऊन कौतुक करण्यात आले आहे आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकांचं मन जिंकत आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Delhi police officer arrests gold chain thieves in film style asp

First published on: 27-09-2023 at 14:17 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×