Viral Video : दिल्ली पोलीस हटके पद्धतीने नागरिकांना अनेक गोष्टींबाबत सतर्क करताना दिसून येते. सायबर क्राइमपासून वाचण्यासाठी आता सोशल मीडियावर दिल्ली पोलिसांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी एक अनोखा जुगाड सांगितला आहे. हा जुगाड पाहून तुम्हीही थक्क व्हाल आणि कोणीही तुमचा पासवर्ड चोरू शकणार नाही.
हल्ली सर्वकाही ऑनलाईन झाले आहे. ऑनलाईनच्या या जगात सध्या गुन्हेगारी सुद्धा वाढली आहे. ऑनलाईन स्कॅम, सायबर गुन्हेगारी, फसवणूक, पासवर्ड चोरीला जाणे असे अनेक प्रकरणे दिसून येतात. अशावेळी सावध राहणे गरजेचे आहे. आपला पासवर्ड सुरक्षित आणि कठीण असणे, अपेक्षित आहे. याविषयी दिल्ली पोलीस जनजागृती करताना दिसून आले.

दिल्ली पोलिसांनी शेअर केला व्हिडीओ

दिल्ली पोलिसांनी एक्सवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एका भिंतीवर तुम्हाला एक पोस्टर लावलेले दिसेल. या पोस्टरवर फ्री वायफायचे नेटवर्क असे लिहिलेय आणि खाली नेटवर्कचे नाव लिहिलेय आणि यासह पासवर्ड खाली दिल्याचे सांगितले आहे. जर कोणाला पासवर्ड जाणून घ्यायचे असेल तर त्याखाली असलेला एक कागद ओढायचा आहे. काढल ओढल्यानंतर जे काही दिसते, ते पाहून तुम्हीही थक्क व्हाल. कागद ओढल्यानंतर तुम्हाला पासवर्ड दिसेल पण हा पासवर्ड खूप मोठा आणि आणि तितकाच कठीण होता. हा व्हिडीओला मजेशीर वृत्तीने बनवला आहे. कठीण पासवर्ड तुम्हाला सायबर गुन्हेगारीपासून वाचवतो.

8 year old girl raped in andhra pradesh Crime news
धक्कादायक! शाळेतील मित्रांकडूनच आठ वर्षीय मुलीची बलात्कार करून हत्या; श्वान पथकाने आरोपींचा ‘असा’ काढला माग
nitesh rane summons news
दिशा सालियन मृत्यू प्रकरणी नितेश राणेंना मुंबई पोलिसांची नोटीस; १२ जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश!
loksatta ulta chasma
उलटा चष्मा : वायफळ तक्रार!
father arrested for raping minor daughter
बाप नव्हे हैवान! वडिलांकडूनच अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण; घरी कुणी नसताना खोलीत शिरला अन्…
young boys were sprinkling water on Train then passengers beat them
चालत्या ट्रेनवर पाणी उडवत होते, लोकांनी खाली उतरून तरुणांना धू धू धुतले, पाकिस्तानचा व्हिडीओ व्हायरल
Chandigrah accident
मॉलमधील टॉय ट्रेन उलटल्याने ११ वर्षीय मुलाचा चिरडून मृत्यू, पाहा धक्कादायक घटनेचा VIDEO
Lawrence Bishnoi
लॉरेन्स बिश्नोईने तुरुंगातून पाकिस्तानी गँगस्टरला केला VIDEO कॉल? ईदच्या शुभेच्छा दिल्याचा दावा!
Aarti Yadav sister accuses the police on a murder complaint vasai
हत्येपूर्वी तक्रार करूनही पोलिसांनी कारवाई केली नाही;  मयत आरती यादवच्या बहिणीचा पोलिसांवर आरोप

हेही वाचा : अमरावतीत राणांच्या समोर काँग्रेसची बाजी? ओपिनियन पोलची आकडेवारी पाहून दोन्ही पक्षांचे समर्थक थक्क, गडबड अशी की..

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : वडापाव गर्ल चंद्रिका दीक्षितला दिल्ली पोलिसांनी केली अटक? व्हायरल व्हिडीओमध्ये केला दावा, जाणून घ्या सविस्तर…

DelhiPolice या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “पासवर्ड तयार करताना सर्व सेफ्टी टिप्स वापरा. जागरूक रहा, सुरक्षित रहा.” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.