ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक हॉटेलमालक वेगवेगळ्या भन्नाट कल्पना वापरत असतात. हॉटेलमध्ये गेलो की आपण एखादी ऑर्डर करतो. जर तुम्हाला कुणी खाण्यासाठी पैसे दिले तर….? होय. हे खरंय. पण त्यासाठी तुम्हाला एक स्पेशल काठी रोल खावं लागणार आहे. सर्वात विशेष बाब म्हणजे हा काठी रोल जर तुम्ही २० मिनिटांत खाऊन दाखवला तर तुम्हाला एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल २० हजार रूपये मिळणार आहेत. आता तुम्ही विचार विचार करत असाल असं नक्की काय आहे या रोलमध्ये? तर हा व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ नक्की पाहा.

हे एका हॉटेल चालकाने खवय्यांना दिलेलं चॅलेंज आहे. या चॅलेंजमध्ये तुम्हाला खाण्यासाठी पैसे दिले जाणार आहे. पण यासासाठी तुम्हाला एक काठी रोल खावं लागणार आहे आणि ते ही २० मिनिटांत. आता तुम्ही म्हणाल एक रोल खाणं हे काही विशेष नाही. तर थोडं थांबा. कारण हा रोल कोणता साधा सुधा नाही, तर तब्बल १० किलो वजनाचा विशालकाय काठी रोल आहे.

दिल्लीमधल्या मॉडेल टाऊन -3 इथल्या रस्त्याच्या कडेला असलेल्या एका स्टॉलवर दुकानदाराने खवय्यांना चॅलेंज दिलंय. तीन वर्षाच्या मुलाच्या लांबीच्या बरोबरीने असलेला हा काठी रोल जो कोणी २० मिनिटांत खाऊन संपवेल त्याला २० हजार रूपये देण्याचं चॅलेंज या दुकानदाराने दिलंय. हा भलामोठा काठी रोल पाहिल्यानंतर लोकांना मोठा धक्का बसला आहे.

हा इतका मोठा काठी रोल माणसाने खावून संपवणं अशक्य आहे. बरेचजण ही पैज जिंकायची म्हणून मोठ्या उत्साहाने या स्टॉलवर येत आहेत. पण इतका मोठा रोल संपवता संपवता त्यांच्या नाकी नऊ येत होतं आणि अखेर हात हलवत ते परत निघून जाताना दिसून येत आहेत.

काठी रोल चॅलेंजचा व्हिडीओ होतोय व्हायरल

या काठी रोल चॅलेंजचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या अनोख्या फूड चॅलेंजचा व्हिडीओ फूड ब्लॉगिंग पेज द फूड कल्ड नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केलाय. नेटिझन्सना हा काठी रोल चॅलेंजचा व्हिडीओ खूपच आवडलाय. या व्हिडीओला आतापर्यंत ९ लाख ४४ हजार लोकांनी पाहिलंय. अनेक युजर्स तर या व्हिडीओवर बरेच मजेदार कमेंट्स करताना दिसून येत आहेत.

इतक्या किंमतीचा आहे विशालकाय काठी रोल

विशाकाय काठी रोलबद्दल जाणून घेऊयात. हा भलामोठा काठी रोल गव्हाच्या पिठापासून बनवला जातो. गव्हाच्या पिठात आत ३० अंडी घातली जातात. यासह, अनेक भाज्या, पनीर आणि सोया चाप घातलं जातं. पराठा भरल्यानंतर त्यात अनेक प्रकारचे सॉस आणि अंड्यातील बलक भरले जातात. काठी रोल तयार केल्यानंतर त्याचं वजन सुमारे १० किलो होतं आणि या रोलची किंमत ही जवळपास ३००० ते ४००० रुपयांच्या दरम्यान आहे. पाटणा रोल सेंटरच्या स्टॉलवर हा भलामोठा रोल उपलब्ध होत आहे.

जर तुम्हालाही या काठी रोलचं चॅलेंज स्वीकारायचं असेल, तर तुम्ही तुमच्यासोबत अन्न पचवण्यासाठीची औषधही जवळ ठेवा. कारण हा रोल दिसायला इतका मोठा आहे की तुम्हाला तो पाहूनच पोट भरल्यासारखं वाटू लागेल.