चोरट्यांनी कार चोरल्याचा व्हिडीओ ट्विट करत काँग्रेस नेते पंखुरी पाठक यांनी दिल्ली पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. पाठक यांनी केलेल्या या ट्विटमध्ये त्यांच्या मालकीची असणाऱ्या फॉर्च्यूनर SUV ही कार चोरुन नेल्याच्या घटनेचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये चोरटे अगदी आरामात कसलीही भीती न बाळगता कार चोरताना दिसतं आहेत. धक्कादायक बाब म्हणजे ही कार चक्क तिहार तुरुंगासमोरुन चोरली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या चोरीच्या घटनेनंतर पाठक यांनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे. “काल रात्री जनकपुरी येथील मुख्य रस्त्यावरून आमची फॉर्च्यूनर SUV ही कार चोरीला गेली. जवळपास अर्धा तास चोरटे कसलीही भीती न बाळगता कारचा दरवाचा उघडून ती चोरण्याचा प्रयत्न करत होते. शिवाय ही कार एका बँकेच्या समोर लावली होती, ज्या ठिकाणी एका रांगेत अनेक बँका आहेत, तरीही चोरट्यांनी एवढ्या आरामात आणि कसलीही भीती न बाळगता ही कार चोरली आहे आणि दिल्ली पोलीस झोपा काढत आहेत.”

हेही वाचा- लोकांनी वीज बिल भरलं नाही म्हणून कंपनीने जप्त केले फ्रीज, टीव्ही, कुलर…

पाठक यांनी कार चोरीच्या प्रकरणावरुन पोलिसांवर आरोप केला आहे. तर या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून नेटकरी देखील पोलिसांना दोष देत आहेत. शिवाय तुरुंगाच्या समोरुन जर एवढ्या सहज चोरांना चोरी करता येत असेल तर इतर ठिकानांची काय परिस्थिती असेल त्याचा अंदाज लावायला नको असंही पाठक यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा- इच्छा तिथे मार्ग! दुकानासाठी जागा नाही म्हणून त्याने केला देसी जुगाड, Viral फोटोवर होतोय कौतुकाचा वर्षाव

दरम्यान, चोरट्यांनी ही कार चोरली आहे. ते ठिकाण तिहार तुरुंगाच्या समोर असून या ठिकाणी अनेक नामांकीत बँका देखील आहेत. त्यामुळे जर चोरटे एवढी मोठी गाडी चोरत होते तर तेथील सुरक्षारक्षक आणि पोलिसांच्या ही बाब कशी लक्षात आली नाही. शिवाय या चोरांवर काही कारवाई झाली नाही तर त्यांचं धाडस वाढेल आणि ते बँकांवर दरोडा घालायला देखील ते मागेपुढे बघणार नाहीत, अशा प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi viral crime news congress leaders car stolen from in front of jail jap
First published on: 25-11-2022 at 15:47 IST