Mail Delivery Using Drone : २५ मिनिटात ४६ किमीवर वैद्यकीय सामानाची डिलेव्हरी, तेही ड्रोनच्या सहाय्याने; देशातील पहिलाच प्रयत्न यशस्वी

India Post Deliver Mail Using Drone : प्रायोगिक प्रकल्पांतर्गत पहिल्यांदाच भारतीय टपाल विभागाने गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात ड्रोनच्या मदतीने पार्सल पोहोचवले.

Mail Delivery Using Drone : २५ मिनिटात ४६ किमीवर वैद्यकीय सामानाची डिलेव्हरी, तेही ड्रोनच्या सहाय्याने; देशातील पहिलाच प्रयत्न यशस्वी
( संग्रहित छायचित्र )

प्रायोगिक प्रकल्पांतर्गत पहिल्यांदाच भारतीय टपाल विभागाने गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात ड्रोनच्या मदतीने पार्सल पोहोचवले. या ड्रोनने २५ मिनिटांत ४६ किलोमीटरचे अंतर कापल्याचे सांगितले जात आहे. पीआयबी अहमदाबादच्या म्हणण्यानुसार, केंद्रीय दळणवळण मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली हे पार्सल कच्छ जिल्ह्यातील भुज तालुक्यातील हबे गावातून भचाऊ तालुक्यातील नेर गावात पोहोचवण्यात आले. या पायलट प्रोजेक्टच्या यशामुळे भविष्यात ड्रोनद्वारे पार्सल पोहोचवणे शक्य होणार आहे.

पीआयबीने सांगितले की, आधुनिक तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने, भारतीय टपाल विभागाने देशात प्रथमच ड्रोनच्या सहाय्याने कच्छ, गुजरातमध्ये पार्सल वितरणाची यशस्वी प्रायोगिक चाचणी घेतली आहे. प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकानुसार, ड्रोनला सुरुवातीच्या ठिकाणापासून ४६ किमी अंतरावर असलेल्या गंतव्यस्थानावर पार्सल वितरीत करण्यासाठी २५ मिनिटे लागली.

Video : अमेरिकेतही पुष्पाची जादू; १३ वर्षांच्या मुलीने व्हॉयोलिनवर वाजवलं ‘Oo Antava’

केंद्रीय संचार राज्यमंत्री देवुसिंह चौहान यांनी ट्विटरवर सांगण्यात आलेल्या माहितीनुसार, या पार्सलमध्ये वैद्यकीय संबंधांचे साहित्य होते. पायलट प्रोजेक्टने विशेषत: ड्रोनद्वारे पार्सल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्याच्या खर्चाचा अभ्यास केला गेला असून यासोबतच पार्सल पोहोचवण्याच्या कामात गुंतलेल्या कर्मचाऱ्यांमधील समन्वयाचीही चाचणी या काळात झाली, असे प्रकाशनात म्हटले आहे.

निवेदनानुसार, प्रयोग व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी झाल्यास, पोस्टल पार्सल सेवा अधिक वेगाने कार्य करेल. चौहान यांनी शनिवारी ट्विट केले की देशात ड्रोन महोत्सव २०२२ साजरा होत असताना, टपाल विभागाने गुजरातमधील कच्छमध्ये ड्रोनद्वारे पार्सल पाठवण्याचे यशस्वीपणे प्रयोग केले. ड्रोनने २५ मिनिटांत ४६ किलोमीटर अंतर कापून औषधाचे पार्सल यशस्वीपणे वाहून नेले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Delivery of medical supplies at a distance of 46 km in 25 minutes with the help of drones the first attempt in the country was successful pvp

Next Story
आधी धू धू धुतलं…मग दोघांनी हात मिळवले, VIRAL VIDEO पाहून तुम्ही सुद्धा गोंधळून जाल
फोटो गॅलरी